क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची रूटर सोबत भागीदारी


मुंबई, २२ डिसेंबर २०२१ : गेमिंग कंटेंट निर्मितीत आमूलाग्र बदल करत राहताना रूटर या आघाडीच्या गेम स्ट्रीमिंग आणि ईस्पोर्टस् प्लॅटफॉर्मने क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांच्यासोबत भागीदारी केली आहे. ही गेमिंग उद्योगातील पहिलीवहिली भागीदारी युजवेंद्र चहल यांना रूटरच्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट क्रिएटर म्हणून समोर आणेल. चहल हे सध्याच्या भारतीय क्रिकेटपटूंपैकी सर्वांत मोठ्या गेमर्सपैकी एक आहेत आणि त्यांना संधी मिळते तेव्हा ते आपला गेमिंगचा छंद जोपासतात. चहल आपल्या पत्नीसोबत तसेच यूट्यूब सेन्सेशन धनश्रीसोबत व्हायरल व्हिडिओ बनवण्यात प्रसिद्ध आहेत. रूटरवरील स्ट्रीमिंग समुदाय आणि प्रेक्षकांना आता युजवेंद्र चहल बीजीएमआय व फ्रीफायर खेळायला लाइव्ह जातील तेव्हा त्यांच्याशी चॅट करता येईल.


     रूटरचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यान्वयन अधिकारी दिपेश अग्रवाल म्हणाले की, “आपल्या देशात कायमच क्रिकेटचे वेड राहिले आहे आणि मागील २-३ वर्षांत गेमिंग हा एक प्रमुख खेळ आपल्याकडे मानला गेला आहे. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी एकत्र आणून प्रेक्षकांसाठी या दोन्ही जगांमधील सर्वोत्तम आणण्याइतके चांगले काय असू शकते. युजवेंद्र रूटरवर स्ट्रीमिंग होणार असल्याने आम्हाला आमच्या समुदायाला आणखी स्वारस्यपूर्ण कंटेन्ट देता येईल. आमचा समाज त्यांच्याशी जोडला जाऊन ते या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीम होत असताना त्यांच्या क्रिकेटच्या आयुष्याबाबत चर्चा करू शकेल."


     “मी लॉकडाऊनमध्ये कॉल ऑफ ड्यूटीसारखे ऑनलाइन गेम्स खेळायला सुरूवात केली आणि तेव्हापासून फर्स्ट पर्सन शूटर गेम्सशी मी जोडला गेलेलो आहे. रूटरकडे भारतात मोठा गेमिंग समुदाय आहे. त्यांच्यासोबत सहभागी झाल्याने मला देशातील बुद्धिमान गेमर्ससोबत जोडले जाऊन माझ्या चाहत्यांशी संवाद साधता येईल. मला या भागीदारीमुळे खूप उत्सुकता वाटते आहे,” असे भारतीय क्रिकेट संघाचे लेग स्पिनर युजवेंद्र चहल यांनी सांगितले.


    मागील एका वर्षापासून गुगल प्ले स्टोअरवरील क्रीडा क्षेत्रातील ३५ दशलक्षपेक्षा अधिक डाऊनलोड्ससह रूटर हा पहिल्या क्रमांकाचा अ‍ॅप असून तो गेम स्ट्रीमिंग आणि ईस्पोर्टस् प्लॅटफॉर्म आहे, ज्यात उगवते कंटेंट क्रिएटर्स आणि लाइव्ह गेम स्ट्रीमर्स आहेत. वेगाने वाढणाऱ्या आणि बदलणाऱ्या क्षेत्रात बाजारातील आघाडीची कंपनी म्हणून हा अद्ययावत प्लॅटफॉर्म ई स्पोर्टसच्या स्पर्धा आयोजित करण्यात आघाडीची भूमिका बजावतो आणि ई स्पोर्टसला भारतात प्रोत्साहन देऊन पात्र खेळाडूंना विविध संधी देतो.

Post a Comment

0 Comments