पत्रकार कुणाल म्हात्रे यांना 'लोकसेवा गौरव पुरस्कार’ प्रदान

■युनायटेड बुद्धीस्ट अॅण्ड आंबेडकराईट फाउंडेशनने केला सन्मान....


कल्याण , प्रतिनिधी : कल्याण मधील पत्रकार कुणाल म्हात्रे यांना ‘लोकसेवा गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. युनायटेड बुद्धीस्ट अॅण्ड आंबेडकराईट फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिन गौरव सोहळ्यात केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त आर. डी. शिंदे यांच्याहस्ते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन म्हात्रे यांना गौरविण्यात आले. यावेळी भिवंडी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, मुरबाडचे प्रांत अधिकारी रोहितकुमार राजपूत, युनायटेड बुद्धीस्ट अॅण्ड आंबेडकराईट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.  


संविधान जागृती हे एक राष्ट्र निर्माणाचे कार्य आहे. याच संविधानाचा गौरव करण्यासाठी सेवाभावी कार्यात अग्रेसर असलेल्या युनायटेड बुद्धीस्ट अॅण्ड आंबेडकराईट फाउंडेशन या संस्थेच्या विद्यमाने गुरुवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात संविधान दिन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या संविधान दिन गौरव सोहळ्याच्या प्रारंभी 'गंध स्वरांचाहा संगित प्रधान प्रबोधनात्मक गित गायनाचा कार्यक्रम  पार पडला.


 याच कार्यक्रमादरम्यान समाज सेवेत असलेल्या कल्याण डोंबिवली परिसरातील लोकसेवकांचा मान्यवरांच्याहस्ते 'लोकसेवा गौरव पुरस्कारदेवून गौरव करण्यात आला. या संविधान दिन गौरव सोहळ्यात 'दै.भारत लोकधारा या दैनिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन देखील करण्यात आले. युनायटेड बुद्धीस्ट अॅण्ड आंबेडकराईट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

Post a Comment

0 Comments