अमृत महोत्सवाची बालसंजीवनी उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी


कल्याण , प्रतिनिधी  : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'अमृतमहोत्सवाची बालसंजीवनी 'उपक्रम   एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कल्याण ग्रामीण बिट आजदे 1 अंगणवाडी केंद्र नंदिवली येथे  राबविण्यात आला. 


           या  उपक्रमात केडीएमसीचे वैद्यकीय अधिकारी  व त्यांच्या टिम  मार्फत ११ते १८ वयोगटातील ६० किशोरी वयीन  मुलींची   एचबी आणि सीबीसी  तपासणी करण्यात आली.  या कार्यक्रमा मध्ये मुलींचे वजन घेण्यात आले आणि त्यांचा रक्तदाब तपासणी करून एचबी  आणि सीबीसी तपासणी  करण्यात आली. तसेच मुलींना आयर्न च्या गोळ्या देण्यात आल्या. 


          डॉ दीक्षा बोरगे  यांनी मुलींना आहार विषयक  मार्गदर्शन केले . या कार्यक्रमा साठी बिट आजदे १ च्या पर्यवेक्षिका उषा लांडगे तसेच सिस्टर अनिता घेडाम,आशा सेविका, नांदीवली येथील चारही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या.
 

           या कार्यक्रमाला उपस्थित किशोरी मुलींना  पार्ले ग्लुकोज  बिस्कीट वाटप करण्यात आले. ब्लड तपासणी करिता लॅब ला पाठविण्यात आले व २ दिवसांनी रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर कमी एचबी असणाऱ्या व कुपोषित मुलींना ओषध उपचार करण्यात येतील अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.

Post a Comment

0 Comments