लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी सहभागी होण्याचे महावितरणचे आवाहन


कल्याण, प्रतिनिधी :  कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले तसेच वीज चोरीची दाखलपूर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी शनिवारी (११ डिसेंबर) तालुका न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीतून मिळणार आहे. संबंधित ग्राहकांनी या संधीचा लाभ घेऊन निराकरण करून घ्यावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.


         परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ३७ हजार ग्राहकांना व वीज चोरीबाबत दाखलपूर्व आणि प्रलंबित एक हजार प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यात येणार आहेत. संबंधितांना राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. काही कारणांनी नोटिसा न मिळालेल्या ग्राहकांनाही या अदालतीत सहभागी होता येईल. महावितरणच्या नियमानुसार अदालतीत सहभागी ग्राहकांना सवलत देण्यात येईल. 


       या सवलतीचा लाभ घेऊन थकबाकीची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात येणार आहे. तर ही संधी डावलणाऱ्या संबंधित ग्राहकांवर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कल्याण परिमंडल अंतर्गत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील संबंधित ग्राहकांनी राष्ट्रीय लोक अदालतीत सहभागी होण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Post a Comment

0 Comments