या प्रभागात बिनविरोध निवडणूक होणार नाही...शिवसेनेचा दावा


डोंबिवली ( शंकर जाधव ) २०१५ सालात  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत डोंबिवली पूर्वेकडील प्रभाग क्र.४६ कांचनगाव-खांबाळपाडा येथे बिनविरोध निवडणूक झाली आणि भाजपला आपला पहिला उमेदवार निवडणून आणण्यास यश आले.शिवसेनेने आपला उमेदवार उभा करण्याची तयारी केली होती, मात्र ऐनवेळी उमेदवाराला अर्ज बाद झाला होता.


      या प्रभागात शिवसेनेची ताकद तशी कमी असली तरी पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मात्र असे होणार नाही. या प्रभागात बिनविरोध निवडणूक होणार नाही.शिवसेना ताकदीनिशी लढत देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते खांबाळपाडा बालाजी आंगण येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी शाखा सुरु झाली कि जनतेची कायम सेवा करत असल्याचे सांगितले.


        शाखाप्रमुख गिरीश काळण यांच्या खांबाळपाडा येथील बालाजी आंगण जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ,राजेश कदम,महिला पदाधिकारी कविता गावंड,शाखाप्रमुख सचिन जोशी,उपविभागप्रमुख संजय भोसले, वैभव राणे,विजय चौधरी, एकनाथ भोईर,प्रवीण पवार,किरण भेरे,करण पाटील, संतोष चौधरी,राधेश्याम गुप्ता,सुधीरभाई लोध आदिसह शिवसैनिक उपस्थित होते.


        यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी शाखाप्रमुख काळण यांना सल्ला देत शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय कायम जनतेच्या सेवेसाठी सुरु ठेवा असे सांगितले.तर जवळपास दीड लाख नागरिकांच्या घरी महानगर गॅस कनेक्शन देण्यात आले आहे.शिवसैनिकांनी जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क करून गॅस कनेक्शन नोंद करण्याची माहिती द्या असे निर्देश दिले.


     शाखाप्रमुख काळण म्हणाले,निवडणुकीत या प्रभागात शिवसेना ताकदीनिशी उभी राहणार आहे.मी या प्रभागात १२०० हून अधिक मतदान नोंदणी केली.अवघ्या दोन दिवसात ३०० हून अधिक ई-श्रमिक कार्ड काढून दिले.सर्वात महत्वाचे म्हणजे येथील स्मशानभूमीचा प्रश्न अद्याप सुटला नाही.येथील नागरीक मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पाथर्ली येथील स्मशानभूमीत घेऊन जातात, हि समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

 


चौकट

 

कोरोना योद्धा श्रीधर घाडगे यांची शिवसेनेने घेतली दखल करोनाने मृत्यू पावलेल्यांववर स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार करणाऱ्या  करोना काळात मृत्यूलाही न घाबरणाऱ्या कोरोना योद्धाची दाखल शिवसेने घेतली आहे. श्रीधर घाडगे असे या करोना योद्धाचे नाव आहे.पालिकेने ज्यांची साधी दाखल हि घेतली नाही,परंतु देवावर भरोसा ठेवून घाडगे यांनी केलेल्या या कार्याबाबत जनतेने सलाम केला आहे.  

Post a Comment

0 Comments