विविध व्याधींवर भारतीय संगीत चिकित्सा अत्यंत प्रभावी - शॉन क्लार्क

■महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने  आरोग्यासाठी संगीत चिकित्सा’ या विषयावर संशोधन सादर


कल्याण, प्रतिनिधी  : विविध व्याधींवर भारतीय संगीत चिकित्सा अत्यंत प्रभावी असल्याचे मत शॉन क्लार्क यांनी व्यक्त केले. ते www.hinduscriptures.com’ या संकेतस्थळाने आयोजित केलेल्या आरोग्यासाठी संगीत चिकित्सा’ या विषयावरील फेसबुक वेबिनारमध्ये बोलत होते. या वेबिनारचे आयोजन संकेतस्थळाच्या संस्थापिका आणि द हिंदू कल्चर अँड लाईफस्टाईल/द वेज सफारी’ या ग्रंथाच्या लेखिका वैशाली शहा यांनी केले होते.


आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध असणारे संगीत व्यक्तीला रोग बरा होण्यास आणि औषधांवरील अवलंबित्व अल्प करण्यास साहाय्य करू शकते का ?’, हे जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने उच्चरक्तदाब (हायपरटेन्शन) असलेल्या व्यक्तींवर काही चाचण्यांद्वारे संशोधन करण्यात आले. या संशोधनातून आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक नाद अथवा संगीत व्यक्तीला विविध आजारांवर मात करण्यास साहाय्य करू शकतात. 


तसेच विदेशी संगीत चिकित्सेपेक्षा भारतीय संगीत चिकित्सा अधिक प्रभावी असल्याचे संशोधनात आढळून आलेअसे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे शॉन क्लार्क यांनी केले.  या वेळी क्लार्क यांनी संगीताचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम’ अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले संशोधन सादर करण्यात आले.

Post a Comment

0 Comments