नाईलिट औरंगाबाद संस्थेच्या वतीने कल्याण मधील जेष्ठांना मार्गदर्शन

■"तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे सक्षमीकरण आणि जीवन सुधारण्यासाठी" प्रकल्प


कल्याण , कुणाल  म्हात्रे : नाईलिट औरंगाबाद ही संस्था,  महाराष्ट्रातील अकोलाऔरंगाबादनाशिकठाणे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर "तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ज्येष्ठ नागरिकांचे सक्षमीकरण आणि जीवन सुधारण्यासाठी" प्रकल्प राबवत आहे. या अभियानांतर्गत रविवारी कल्याण पश्चिमेतील  विश्वसंत  सदगुरु  वामनराव पै सभागृह येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पार पडले. डॅा. संजीवकुमार गुप्ता कार्यकारी संचालक नाईलिट औरंगाबाद यांनी जेष्ठ नागरीकांना कार्यशाळेत संबोधित केले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी माजी नगरसेवक संजय पाटील, माजी नगरसेविका निलिमा पाटीलव स्मार्टबाईट कॅाम्पुटरच्या संचालिका  दिपा जोशी यांचे सहकार्य लाभले.


या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये वृद्धांसाठी सुमारे ४० राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणे,  त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी लागू केलेले कायदेऑनलाइन  अॅप्सचा वापर नियमित कामांसाठी सुरक्षित पद्धतीने करणे यांचा समावेश आहे. पेन्शनबिल पेमेंटऔषधेखरेदीतिकीट बुकिंगवृद्धापकाळ आणि आरोग्य सेवाकोविडपासून बचाव आणि उपचार आदींबाबत माहिती देण्यात आली.


नाईलिट औरंगाबाद ही इतर सर्व सामाजिक संस्था आणि संबधित शासकीय  विभागांच्या संपर्कात आहे. जे ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी काम करत आहेत. मराठीहिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये भरपूर उपयुक्त माहिती आणि संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी एक पोर्टल (http://nielit.gov.in/aurangabad/content/senior-citizenतयार केले आहेजे ज्येष्ठ नागरिक आणि इतर जणांना मोफत उपलब्ध आहे. यामध्ये शंभरहून अधिक  व्हिडिओ सादरीकरणेउपयुक्त दस्तऐवज आणि जिल्हावार तपशील, वृद्धाश्रमरक्तपेढ्यारुग्णवाहिका सेवा प्रदातेजेरियाट्रिक केअर सेंटर्सएनजीओ आणि धर्मादाय/सवलतीच्या प्रयोगशाळाकोविडवरील ई-सामग्री आदींचा समावेश आहे.


स्मार्टफोनशासकीय योजना व  कायदेवापरासाठी तपशीलवार माहिती असलेली मराठी भाषेतील सुलभ पुस्तिका कायमस्वरूपी संदर्भ म्हणून सहभागींना विनामूल्य दिले गेले. नाईलिट औरंगाबाद समविचारी सामाजिक संस्था आणि ठाणे मधील इतर लोकांशी हातमिळवणी करून हा प्रकल्प योग्य रीतीने राबविण्यास उत्सुक आहे. ठाणे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना संवेदनशील केले जात आहे. नाईलिट द्वारे कोविड महामारीशासकीय  योजनास्मार्टफोनचा वापरऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षिततेचे उपायजेरियाट्रिक हेल्थ केअर यांवरील सत्रे ऑनलाइन/ऑफलाइन मोडमध्ये आयोजित केली आहे. रेकॉर्ड केलेली व्याख्याने देखील प्रक्षिपित केली जातील आणि शंका निरसन आणि सरावाने शिकणे यावर विशेष भर दिला जाईल.


ही सत्रे ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरतील आणि स्मार्टफोन तंत्रज्ञान हाताळण्यात निर्भय बनतील अशी अपेक्षा आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारी विभाग आणि समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांना मदत करेल अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण करणे अपेक्षित आहे. या प्रकल्पातील सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आम्ही स्थानिक उद्योगमहानगरपालिका आणि राज्य सरकारच्या विभागांकडूनही मदतीची अपेक्षा करत असल्याचे  नाईलिटच्या वतीने सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments