भिवंडी दि 15 (प्रतिनिधी )भल्या भल्या गुन्हेगारांना आजही खाकीवर्दीतल्या पोलिसांना पाहून घाम फुटतो. मात्र भिवंडीत काहीसे वेगळेच घडल्याचे पाहावयास मिळाले आहे.भिवंडी तालुक्यातील कोनगावात चोरटयांनी एकाच रात्री डझनभर दुकाने शटर उचकातून गल्ल्यातील रोकड व काही माहगडे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून 'चोर मस्त आणि पोलीस सुस्त' अशी चर्चा कोनगावातील नागरिक करताना दिसत आहे.
भिवंडीत गुन्हेगारी, घरफोड्यासह चोरीच्या घटनात वाढ..
भिवंडी शहरात मोठ्याप्रमाणात गुन्हेगारी, घरफोड्या, चोरी घटनात मोठी वाढ झाल्याचे पोलीस ठाण्यात केलेल्या नोंदीवरून दिसून येते. त्यामध्ये भिवंडी पोलीस परिमंडळ दोनच्या हद्दीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भिवंडी - कल्याण मार्गावरील कोनगाव नाक्यावर आणि गावातील दुकानांना चोरटयांनी लक्ष करीत काल एकाच रात्री डझनभर दुकानांचे शटर कश्याने तरी उचकटुन आत प्रवेश करीत दुकानांतील गल्ल्यात असलेली रोकड आणि काही महागडे साहित्य लंपास केले.
यामध्ये ५ मेडिकल २ स्वीट मार्ट (मिठाईची दुकाने ) आणि २ इतर दुकानाचा समावेश आहे. तर तीन दुकानाचें शटर चोरटे उचकट असताना आवाज झाल्याने चोरटयांनी पळ देखील काढला होता. मात्र रात्रपाळीची असलेली पोलीस गस्त दिसून आली नसल्याचे नागरिक सांगित . असून चोरी झाल्यानंतर अर्घ्यातासाने पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.
दुकाने फोडणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद ..
महत्वाची बाब म्हणजे चोरटे एका मिठाईच्या दुकानात चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाले असून आता कोनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याच्या शोध घेण्यासाठी पोलीस पथके तयार करीत रवाना केल्याची माहिती भिवंडी पोलीस परिमंडळचे पोलीस उपाआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे..
0 Comments