बॉक्सिंग स्पर्धेत कल्याणचे खेळाडू चमकले


कल्याण , प्रतिनिधी : मुंबई आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा ही आशिया खंडातील सर्वात जुनी व मानाची समजली जाणारी स्पर्धा आहे.  मुंबई विभागातील सर्व बॉक्सर्स आपण सुद्धा या स्पर्धेत चॅम्पियन बनावे अशी स्वप्ने पाहत असतात. गत वर्षी ही स्पर्धा कोरोना प्रादुर्भावाने घेण्यात आली नव्हती व या वर्षी निवड चाचणी स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली. मुंबई येथील ठाकूर  कॉलेज येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कल्याण येथील बिर्ला कॉलेजच्या यश पाटील आणि शुभम सिंग या दोन बॉक्सर्सनी फायनल सामना जिंकून मुंबईच्या संघात आपले स्थान निश्चित केले.


यश पाटील याने 63.5 या वजनी गटात तर शुभम सिंग याने 63.5 ते 67 या वाजनी गटात हे यश मिळवले. यश पाटील ला फायनल मध्ये प्रकाश  कॉलेजच्या सोहन कांचन यांचे कडवे आव्हान होते पण त्याने चोख प्रत्युत्तर देत  सामना एकहाती जिंकला. तर शुभम सिंग याला सुद्धा ठाकूर कॉलेजच्या अभिषेक यादव याचे आव्हान होते  पण शुभम च्या डिफेन्सीव्ह खेळापुढे त्याला गुण मिळवणे कठीण झाले व शुभम याने अचूक प्रहाराने गुण मिळवत सामना आपल्या बाजूने फिरवला.


अखिल भरतीय आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा या 24 डिसेंबर पासून लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब येथे सुरू होणार आहे. दोघे बॉक्सर्स कल्याण येथील बॉक्स2 फिट बॉक्सिंग अकॅडमी येथे प्रशिक्षक विकास गायकवाड यांच्या कडे प्रशिक्षण घेत आहेत .दोन्ही बॉक्सर्स अतिशय उत्तम रीतीने सराव करत असून नक्कीच अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय स्पर्धेत पदक प्राप्त करतील अशी खात्री प्रशिक्षक विकास गायकवाड यांना आहे.

Post a Comment

0 Comments