स्टेशन परिसरात अबोली रिक्षाचालक महिलांसाठी स्वतंत्र रिक्षास्टँण्डची मागणी

■स्वतंत्र रिक्षास्टँण्डचा प्रश्न कधी मार्गी लागणार महिला रिक्षाचालकांचा सवाल..

        

कल्याण, प्रतिनिधी  : कल्याणातील अबोली रिक्क्षा चालक महिलांनी प्रशासकीय यंत्रणांकडे कल्याण, डोंबिवली स्टेशन पूर्व पश्चिम परिसरात स्वतंत्र रिक्षास्टँण्ड अबोली रिक्षांसाठी उपलब्ध व्हावेजेणेकरून अबोली रिक्षाने प्रवास करू इच्छुक महिला प्रवाशांना सोयीचे होईल. या संदर्भात पाठपुरावा करीत आहेत. पण प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे अबोली रिक्षाचालक महिलांचे म्हणणे आहे. 



 महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीसाठी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महिलांना  २०१७ मध्ये अबोली रिक्षा परवाना देण्यास सुरुवात केली. त्यानुसार कल्याण डोंबिवली शहरात आजमितीस सुमारे ३० ते ३५ अबोली रिक्षा आहेत. मात्र महिला रिक्षा चालकांना स्वतःचा रिक्षास्टँण्ड मिळालेला नाहीअबोली रिक्षा सुरुवात करतांना मोठा गाजावाजा केला होता 



कल्याण डोंबिवली शहरात शेकडो अबोली रिक्षा फिरताना दिसतील व महिलांना सुरक्षित प्रवास करता येईल अशा वल्गना शासकीय पातळीवर व लोकप्रतिनिधी यांनी केल्या होत्या मात्र शासन व अधिकारी यांनी अबोली रिक्षा चालकांना प्रोत्साहन दिले नसल्याने अबोली रिक्षांची संख्या वाढली नाही.


 

प्रादेशिक परिवहन विभागवाहतूक पोलीस व कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण डोंबिबली शहरात पूर्व व पश्चिम विभागात अबोली रिक्षा चालकांनी कायमस्वरूपी रिक्षा स्थानक मिळण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे.  कल्याण डोंबिवलीत अबोली रिक्षा व्यवसाय करताना महिला रिक्षा चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.



  सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशी घेण्यासाठी रांगेत उभे राहिल्यास एक ते दीड तास वाट पहातरांगेतील रिक्षा कलावी लागतेत्यामुळे थकवा येतो. त्याच प्रमाणे वेळ जास्त लागत असल्यामुळे व्यवसाय हवा तसा होत नाही. त्यातच सँटीस प्रकल्पाच्या सुरु कामामुळे स्टेशन परिसरातुन भाडे घेणे जिकीरीचे झाले आहे.



अशातच  घरातली सर्व कामे करून रिक्षा चालवावी लागत असल्यामुळे धंदा कमी झाल्यास परवडत नाही रिक्षाचे बँकेचे हफ्ते फेडणे घर खर्चाचा ताळमेळ कसा बसणार कोरोनापार्श्वभुमी मुळे बिघडलेली अर्थिक घडीतुन कस सावरायचं असे अनेक प्रश्न भेडसावत  असल्याचे  अबोली रिक्षाचालक शारदा ओव्हळ यांनी सांगितले.



  तसेच अबोली चालविण्यासाठी महिला पुढे येत नाहीतयामुळे अबोली रिक्षा चालकांसाठी स्टँड राखीव ठेवल्यास महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल यासाठी रिक्षास्टँण्ड आरक्षित ठेवावा अशी मागणी अबोली रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत व कल्याण शहर महिला अध्यक्षा शारदा ओहळ यांनी पालिका प्रशासनआरटीओ व वाहतूक पोलिसांकडे केली आहे.     



        "कल्याण परिवहन उपप्रादेशिक आधिकारी तानजी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता अबोली रिक्षास्टँण्ड संदर्भात वाहतूक शाखेशी समन्वय साधून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले."

Post a Comment

0 Comments