आडीवली - पिसवली विभागात डांबरी व काँक्रिटच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात नगरसेवक कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांना यश


कल्याण , प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आडीवली-पिसवली विभागात नगरसेवक कुणाल पाटील यांच्या माध्यमातून रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून, अनेक महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेकडून या कामांसाठी निधीची उपलब्धता झाली आहे.


         गेल्या काही महिन्यांपासून आडीवली-पिसवली मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली होती. नागरिकांना पावसाळ्यात प्रचंड हाल सोसावे लागले. नगरसेवक कुणाल पाटील यांनी रस्त्यासाठी अनेक वेळा महापालिकेशी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला. परंतु महापालिकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने गेले बरेच महिने या रस्त्याचे काम रखडले होते.


           अखेर नगरसेवक पाटील  यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, पहिल्या टप्प्यात विजय भाने निवास-नेताजी नगर-पिसवली मुख्य कमानी या रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात झाली आहे.  देशमुख होम्स ते जि.प. शाळा,पिसवली  या रस्त्याच्या काँक्रिटिकरण कामाला सुरवात झाली असून, येत्या काही दिवसात नागरिकांना चांगल्या रस्त्याने प्रवास करता येणार असल्याचे, कुणाल पाटील यांनी सांगितले.


           या रस्त्याच्या कामाची पाहणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी केली. त्यावेळेस त्यांच्यासमवेत समाजसेवक अनिल पाटील, कैलास भोईर (मा. सरपंच पिसवली), . नकुल  भोईर (मा.सदस्य, पिसवली) आणि काही कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments