मुंबई महानगरपालिकेचा करोना काळात घोटाळा करण्यात वरचा नंबर महाराष्ट्रात सर्वात जास्त मृत्यू...भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप


डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना काळात सर्वात जास्त आर्थिक घोटाळा करण्यात मुंबई महानगरपालिकेचा वरचा वरचा नंबर आहे.या काळात भारतात सर्वात जास्त करोना मृत्यूची संख्या जास्त आहे. मात्र ठाकरे सरकारने हे जनतेपासून लपवले आहे.हे सरकार याला जबाबदार असून यात घोटाळ्यात मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी सामील असतील तर त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे.मंगळवारी मी स्वतः मुंबई महानगरपालिकेत जाऊन याचा जाब विचारणार आहे.त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा नंबर आहे, असा स्पष्ट ईशारा  भाजप नेते किरीट  सोमय्या यांनी डोंबिवलीत बोलताना दिला.



    भाजपा नेते  सोमय्या रविवारी सायंकाळी  डोंबिवलीतील ठाकूर सभागृहातकार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सोमय्या यांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर निशाण साधला.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि मंत्री अनिल परबयांनी केलेल्या घोटाळ्यावर थेट आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांच्या आशीर्वाद असून हे ठाकरे सरकार जनतेला लुट असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.नवाब मलिक यांच्यावरही निशाणा साधत  `हर्बल गांजा` कोणता असतो असे हसत त्यांची टीग्गल केली.



         क्रोना काळात मोदि सरकार महाराष्ट्राला मोफत लस देणार होते, मात्र मुंबई महापालिकेच्या महापौरांनी आम्हाला तुमची लस नको, आम्ही तीन महिन्यात मुंबईतील सर्व जनतेला लस देऊ असे बोलल्या होत्या. पुढे काय झाले ते सर्वाना माहित आहे, अजूनही मुंबईतील ती जनतेपर्यत लस पोहोचली नाही. करोना काळात मुंबई महापालिकेत खूप आर्थिक घोटाळा झाला आहे. म्हणूनच मी स्वतः पालिकेत जाऊन याचा जाब विचारणार आहे. येथील अधिकाऱ्यांनाहि  सोडणार नाही.



       नंतर कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेची बारी आहे. महाराष्ट्राला लुटण्याची स्पर्धा सुरू असल्याचे सांगितले.यावेळी किरीट सोमय्या यांचे 'महावसुली सरकारचे  हे घोटाळे'  हे पुस्तक कार्यकर्त्याना देण्यात आले.कार्यकर्ता मेळाव्यात आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब,माजी नगरसेवक मंदार हळबे यांसह महिला पदाधिकारी सुहासिनी राणे, पूनम पाटील आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments