केडीमसी क्षेत्रात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या ३१८, १२ नागरिकांशी संपर्क नाही


कल्याण, कुणाल  म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात परदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या ३१८ झाली असून यापैकी ३०६ नागरिकांशी संपर्क झाला असून उर्वरित १२ नागरिकांपैकी काहींचे पत्ते अपूर्ण तर काहींची घरे बंदकाहींचे दूरध्वनी बंद येत आहेत. बंद आढळून आलेल्या घरांच्या पत्त्यांवर पालिकेचा आरोग्य विभाग पुन्हा भेट देणार आहे. 


         तर अपूर्ण पत्ते असलेल्या नागरिकांची यादी शासनास परत पाठवून त्यांचे पूर्ण पत्ते घेतले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. तर परदेशातून आलेल्या नागरिकांपैकी आतापर्यंत ९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ८ आरटीपीसीआर तर  १ ओमीक्रोन पॉझिटिव्ह आला आहे.


Post a Comment

0 Comments