ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन दादोजी कोंडदेव प्रेक्षक गृह, ठाणे ६६वी ठाणे जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा - २०२१ /२२.

■ओम कबड्डी-कल्याण, ग्रिफिन जिम. यांची ५ - ५चढायांच्या जादा डावात आगेकूच...


ठाणे दि.३१ : - ठाणे जिल्हा कबड्डी असो.ने उजाळा क्रीडा मंडळ-वळगांव यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या "६६व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी" स्पर्धेत ओम कबड्डी कल्याण, ग्रिफिन जिम. नवी मुंबई यांनी ५-५ चढायांच्या डावात विजय मिळवीत पुढची फेरी गाठली. ठाण्यातील वळगांव-भिवंडी येथील स्व. जाईबाई काशीनाथ पाटील क्रीडानगरीत सुरू असलेल्या पुरुषांच्या अ गटात ओम कल्याण संघाने मध्यांतरातील ०७-१९ अशा १२गुणांच्या पिछाडीवरून आत्माराम मंडळाला पूर्ण डावात ३०-३०असे बरोबरीत रोखले.त्यानंतर निर्णयासाठी दिलेल्या ५-५ चढायांच्या डावात ०८-०५(३८-३५) असे चकवित दुसरी फेरी गाठली. 


        रक्षित कुंदर,सुनील चव्हाण, आदित्य चाळके या विजयाचे शिल्पकार ठरले.रोहन पाटील, संदीप यांनी पराभूत संघाकडून उत्कृष्ट खेळ केला, पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. पुरुषांच्या दुसरा सामना देखील चुरशीचा झाला. त्यात नवी मुंबईच्या ग्रिफिन जिम.ने ठाण्याच्या होतकरूला ५-५ चढायांच्या डावात ६-५(४२-४१) असे चकवीत विजयाला गवसणी घातली. मध्यांताराला ग्रिफिन संघाकडे २१-१९अशी आघाडी होती. पूर्ण डाव ३६-३६ असा बरोबरीत राहिला. सौरव सणस, विशाल विनिराजद ग्रिफिन कडून, तर सौरभ मिश्रा, सौरभ कोंडे होतकरू कडून उत्तम खेळले. 

 

        याच गटात नवरत्नने वारीअर्सचा ४१-१७ असा पाडाव केला तो कौस्तुभ शिंदे, पवन पवार, साहिल नाखवा यांच्या चतुरस्त्र खेळामुळे. वारीअर्सचा नितीन उमराटकर बरा खेळला. प्रथमेश, लवेश, कल्पेश या पाटील बंधूंच्या नेत्रदीपक खेळाच्या जोरावर विवेक स्मृतीने विश्वरूप संघाला ४७-२८ असे नमवित पुढची फेरी गाठली. स्वप्नील भिलारे, निखिल चांदविलकर विश्वरूप कडून छान खेळले. उजाळा क्रीडा मंडळाने गावदेवी मंडळावर ४२-२३ अशी मात केली. अक्षय भोईर, शुभम पाटील, स्वप्नील पाटील यांच्या चमकदार खेळाने ही किमया साधली. 


         गांवदेवीचे राहुल दळवी, सिद्धेश राणे बरे खेळले. स्व.आकाश मंडळाने अश्वमेघ संघाचा ४४-२५असा पराभव केला. स्व.आकाश कडून वैभव पाटील, अश्वमेघ कडून संजय दुधाने उत्कृष्ट खेळले. महारुद्र युवाने मयुरेश याच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर ओम वर्तकनगर संघावर ४९-४६ अशी मात केली. वर्तकनगरचा निखिल कदम चमकला.

Post a Comment

0 Comments