काम दाखवा अन्यथा गुन्हा दाखल करू.... शिवसेनेचा भाजपा आमदारांना इशारा


डोंबिवली ( शंकर जाधव ) अनेक वर्ष एकत्र येऊन पालिकेवर सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना-भाजप मध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडत आहेत.लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढविलेल्या या दोन्ही पक्षांनी विकास कामाबाबत एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे.खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवलीत विकास कामांचा धडाका लावला असून भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी गेल्या पंधरा वर्षात काय विकास केला असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित  आहे .शिवसेनेने आरोपांवर शांत न बसता ४७१ कोटी रुपयांचे विकास कामांचे नारळ वाढवेल आहेत त्याचे काम दाखवा अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू असा इशारा आमदार चव्हाण यांना दिला आहे.   


  

        शक्रवारी डोंबिवली पूर्वेकडील शिवसेना मध्यवर्ती शाखेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, युवा सेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे आणि सागर दुबे, सतीश मोडक आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी युवा सेना पदाधिकारी म्हात्रे यांनी आमदार चव्हाण यांनी डोंबिवलीकरांनी फसवणूक केल्याचा आरोप करत निवडणुकीच्या तोंडावर ४७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर नसताना भूमिपूजन का केलेत ? आमदार चव्हाण यांनी जनतेची फसवणूक केली आहे.पालिका आयुक्तांवर आरोप करणारे आमदार अनधिकृत बांधकामांची पाठराखण करत असल्याचे सांगितले.  वेंगुर्ला नगरपरिषदेतील विकास कामांना दाखवण्यापेक्षा चव्हाण हे गेली १५ वर्ष डोंबिवली शहराचे आमदार असताना त्यांनी या शहराच्या विकास कामाबद्दल पत्रकारांना माहिती देणे आवश्यक असल्याचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी यावेळी सांगितले.वेंगुर्ला नगरपरिषदेतवरून भाजप पदाधिकारी आल्यावर शिवसेना डोंबिवलीत प्रदर्शन भरविणार आहे.यात डोंबिवलीत अर्धवट राहिलेल्या प्रकल्पाची माहिती पत्रकारांना देऊ असे युवा  सेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.

   

  

चौकट


        शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी भेट घ्यावी. डोंबिवली शहरासाठी आवश्यक असलेल्या विकास निधीसाठी खासदार डॉ शिंदे नक्की मदत करतील.कारण खासदार डॉ.शिंदे हे नेहमीच विकास कामे करत असतात असा उपरोधिक सल्ला या पत्रकार परिषदेत युवा सेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांनी दिला. तर जलवाहतूकीसाठीचा निधी केंद्र सरकारने रद्द केल्याबद्दल आमदार चव्हाण यांनी का विचारला नाही असा प्रश्नही  उपस्थित केला.


 

 

       आमदार चव्हाण यांच्यावर नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेनेने आमदार चव्हाण यांच्यावर डोंबिवलीकरांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. १५ वर्ष आमदार असताना डोंबिवली शहरासाठी त्यांनी कुठली विकास कामे केली ते जनतेला सांगावी असेही यावेळी विचारण्यात आले. 

 

  आता डोंबिवली नाहीत कोकणात निवडणूक लढविणार का ?

 डोंबिवलीचा भकास केल्याचा आरोप करत भाजप आमदार चव्हाण हे  कोकणातील विकास कामे केल्याचे सांगतात. यावरून आमदार आमदार चव्हाण हे आता डोंबिवलीत नाही तर कोकणात निवडणूक लढविणार आहेत का असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. 

  

Post a Comment

0 Comments