समस्यांचे आगार बनलय चिंचपाडा गांव समस्यां निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांचे पालिका आयुक्तांना साकडे


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : "संत गाडगेमहाराज ग्राम स्वच्छता अभियान" तालुका पातळी जिल्हा पातळी पुरस्कार,    " निर्मल ग्रामपुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत चिंचपाडा गावाची कल्याण डोंबिवली महानगर पालिकेमध्ये विलीन झाल्यावर गावात घाणीचे साम्राज्याने परवड होत आहे. कल्याण पूर्वेकडील ग्रामीण भागातील चिंचपाडा गावातील नागरिकांना विविध नागरी समस्यांमुळे मुलभूत सुविधाचा बोजवारा उडल्याने स्थानिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी पालिका आयुक्तांची भेट घेत समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.


         चिंचपाडा गावातील रस्त्याच्या कडेला जागोजागी साचलेला कचरा,खड्यमय रस्तेउघड्यावर गटारांची दुतर्फा सांडपाणी मुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच साथीच्या आजाराने डोकं वर काढल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांन बाबत गावदेवी ग्रामस्थ आगरी चॅरिटेबल संस्थेच्या वतीने  संस्थापक अध्यक्ष एकनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शरद म्हात्रेभगवान म्हात्रेरामदास म्हात्रे व अन्य ग्रामस्थांच्या शिष्ठ मंडळाने पालिका आयुक्तांची भेट घेतली. 


       पालिकेत चिंचपाडा गावाचा समावेश होऊन ही गावातील नागरीकांच्या  मुलभूत नागरी समस्यां सुटत नसल्याने  ग्रामपंचायत मध्ये असताना मुलभूत सुविधा रस्तेगटारे या सुविधा तत्काळ सुटत होत्या पण  केडीएमसीमध्ये  समाविष्ट झाल्यावर समस्यांचा डोंगर दिवसो- दिवस वाढत चालला असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.


गावातील रहिवाशांकडून लाखो रूपये टँक्स स्वरूपात मनपा गोळा करते२०२१ पासुन प्रति टँक्स पावती मागे ६०० दरवाढ घरकचरा नालेसफाईच्या नावाखाली घेतली जात आहे. असे असताना चिंचपाडा गावांची अवस्था अतिशय दयनीय आहे. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न निकाली काढण्यासाठी आयुक्तांपुढे समस्यांचा पाढा वाचला.  आयुक्त डाँ विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना भेडसावणारे प्रश्न तत्काळ सोडविल्या जातील असे आश्वासन दिल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष एकनाथ म्हात्रे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments