कल्याण , प्रतिनिधी : प्लास्टिकला गुडबाय करत कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मानिवली व कला क्षेत्रातील प्रसिद्ध स्केचो अॅक्टीवीटी सेंटरच्या युवा मूर्तिकार चित्रकार आरती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून इको फ्रेंडली सांताक्लॉज फेस मेकिंग कार्यशाळा मंगळवारी शाळेच्या मैदानात उत्साहात संपन्न झाली.
ध्वनी ,वायू ,पाणी अन्न प्रदूषण विरहित जीवन व नैसर्गिक विसर्जन याची सुरवात व्हावी यासाठी मूर्तिकार चित्रकार आरती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली १६२ बच्चेमंडळींना स्वतःच्या हातांनी सांताक्लॉज इकोफ्रेंडली सांताक्लॉज फेस साकारण्याचे शास्त्रशुद्ध तंत्र या कार्यशाळेत शिकवले.
सर्व विद्यार्थ्यांना शाडू मातीचा सांताक्लॉज तसेच इतर कलाकृती कशा बनवाव्या याचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्व समजावले. या वेळी सांताक्लोज कडून विद्यार्थ्यांना पुस्तके खाऊ, भेट देण्यात आली.
मासिक पाळीच्या वेळी देशातील ६२ टक्के स्त्रिया कापडाचा वापर करतात तसेच जिल्हा परिषद, पालिका शाळेत शिकणाऱ्या बहुसंख्य मुली या चाळी आणि झोपडपट्टी भागात राहाणाऱ्या असतात मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी नॅपिकन विकत घेणे त्यांच्या पालकांना परवडत नाही.
तसेच या मुलींना व त्यांच्या पालकांना नॅपिकन कसे वापरावेत, याची माहिती नसते. ही बाब लक्षात घेऊन महिलांचा ‘मासिक’ संघर्ष संपला पाहिजे हि चळवळ व मूलभूत गरज जागरूकता होण्यासाठी म्हणून सांताक्लोज हस्ते मुलींना सॅनिटरी नॅपिकन वाटण्यात आले.
सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण केले आहे त्या प्रमाणे शाळेत सॅनिटरी नॅपिकन मोफत दयावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यार्थी दीड वर्षाच्या कालावधीनंतर शाळेत प्रत्यक्ष पाऊल ठेवत असल्याने विद्यार्थी मित्र परिवार पुन्हा भेटल्याने आनंदित होते. तसेच या वेळी कल्पणा मयेकर मुख्याध्यापीका, विजय प्रगणे सहशिक्षक ,नंदू चौधरी सहशिक्षक, संदेश गायकर संगणक शिक्षक, पूजा वारघडे लॅब शिक्षक, पूजा माळी शिक्षक मित्र ,कल्पना गायकर, सविता गायकर,नीलम गायकर आदी शिक्षक देखील उत्साहात सामील झाले होते.
तसेच टेन्स फ्रीचे किशोर पाथरे, इनरव्हीलचे प्रेसिडेंट स्वाती देशमुख . पास्ट प्रेसिडेंट हेमा दळवी यांचे विशेष सहकार्य लाभले.
0 Comments