सहा वर्षीय मुलावर धारदार शास्त्राने डोक्यावर गंभीर दुखापत अज्ञातावर गुन्हा दाखल

     


                                                      

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : वरपगाव येथील आत्माराम नगरात राहणाऱ्या सहा वर्षीय मुलावर रविवारी दुपारच्या सुमारास खेळाण्यास गेला असता अज्ञाताने धारदार शस्त्राने डोक्यावर गंभीर दुखापत करीत जखमी केल्याची घटना घडली होती.  याप्रकरणी मुलाच्या आईच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलिसांनी मगंळवारी अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.         

                                   

    पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरपगावात राहणाऱ्या प्रियंका रोहीत पवारवय २८ वर्षेरा. वरपगाव ता. कल्याण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  रविवारी त्यांचा ६ वर्षीय मुलगा देव रोहित पवार हा दुपारच्या ३ ते ४वाजण्याच्या दरम्यान वरप येथील कृष्णा ऍम्पायर बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा कोणीतरी अज्ञात आरोपीने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन धारदार हत्याराने त्याच्या डोक्याच्या उजव्या बाजुस गंभीर दुखापत करीत गंभीर जखमी केले. त्याला  उपचारार्थ सरकारी रूग्णालयात नेले.


     याप्रकरणी मुलांची आई प्रियंका हिच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलिसांनी तिच्या मुलाला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस सुत्रांनी प्राथमिक माहिती दिली की,   जखमी मुलाकडे विचारणा केली असता त्यास झलेल्या दुखापती संदिग्ध माहिती देत आहे. घटनेबाबत सीसीटीव्ही फुटेज तसेच जखमेबाबत वैद्यकीय अधिकारी यांचा सविस्तर अहवाल प्राप्त करून घेऊन त्याप्रमाणे पुढील तपास करून घेत आहोत. गुन्ह्याचा तपास एपीआय सोनके हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments