ठाकरे सरकार सत्तेचा दुरुपयोग करतंय, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची टीका नितेश राणेंची केली पाठराखण

■कपिल पाटील यांच्याहस्ते शहाड येथील पादचारी पुलाचे लोकार्पण..


कल्याण , प्रतिनिधी  : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. आघाडी सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहेअसा आरोप करतानाच कपिल पाटील यांनी नितेश राणे यांची पाठराखणही केली आहे.            केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते आज सायंकाळी शहाड रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलाचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.


राज्यातील आघाडी सरकार अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करत असेल तर ते चूकीचं आहे. एखाद्या माणसाचा संबंध असेल तर कायदा सगळ्यांसाठी सारखाच आहे. कायदा कुणाला चूकत नाही. मात्र परिस्थिती निर्माण करुन भाजपचा नेता आहे म्हणून कोणाला अडकविणे हे चूकीचे आहे. आपल्या हाती सत्ता आहे. सत्तेचा दुरुपयोग करुन परिस्थीती निर्माण करणे चूकीचे आहेअसं पाटील म्हणाले.


 शहाड रेल्वे स्थानकात कसाऱ्याच्या दिशेने प्रवासी रेल्वे मार्ग ओलांडून स्टेशन गाठत होते. त्यामुळे अनेकदा अपघात घडले आहेत. हे अपघात रोखले जावेत म्हणून हा पादचारी पूल तयार करण्यात आला आहे. २ कोटी ७५ लाख रुपये खर्च करुन हा पादचारी पूल तयार करण्यात आला आहे.


शिवसेना मनसेत रस्त्याच्या कामावरुन सुरु असलेल्या वादावर कपिल पाटील यांनी भाष्य केलं. कल्याण-डोंबिवलीत श्रेयवाद नेहमी होत राहिला आहे. श्रेय वादापेक्षा लोकांना अपेक्षित असलेली विकास कामे करण्याकरीता पुढाकार घेतला पाहिजे. लोकांना ते जास्त आवडेल. कल्याण-डोंबिवलीत ज्या नागरी सुविधा असायला हव्या होत्या. त्या यापूर्वी झालेल्याच नाहीतयाकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Post a Comment

0 Comments