ठाणे जिल्ह्यातील अवेध्य मंगुर मत्स्योत्पादनाला कोणाचे संरक्षण? मनसेने उपस्थित केला सवाल

■मनसे चे दिनेश बेलकरे यांचे जिल्ह्याधिकारी आणि राष्ट्रीय हरित प्राधिकरणाला पत्र..


कल्याण,कुणाल  म्हात्रे  :  जगभरात बंदी असलेले हे मंगूर मासे पर्यावरणीय इकोसिस्टीमला आणि मनुष्य स्वास्थ्यासाठी खूपच हानिकारक आहेत. मंगूर माशांच्या सेवनाने हृदयरोगडायबेटीसकर्करोगासारख्या भयंकर आजारांचा धोका उद्भवतो. तसेच हे मासे मांसाहारी असल्या कारणानेपाण्यातील इतर जीवांना नष्ट करतात. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. असे असतांना ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मंगूर मत्स्यपालन केले जात आहे. या अवेध्य मंगुर मत्स्योत्पादनाला कोणाचे संरक्षण आहे असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. याबाबत मनसे चे दिनेश बेलकरे यांचे जिल्ह्याधिकारी आणि राष्ट्रीय हरित प्राधिकरणाला पत्र


           बहुतांश तळे हे नदीकिनारी स्थित असूनह्या मत्स्य पालना साठी नदीपात्रातून अवैध्यरित्या पाणी उपसा केला जातोतसेच दूषित झालेले पाणी सर्रासपणे नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे नदीचे पाणी खूपच मोठ्या प्रमाणात दूषित झालेले आहे. दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे हे तळे ओव्हरफ्लो होतात आणि मांगुर मासे नदीपात्रात येतात. त्यामुळे नदीपात्रातील इतर प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच तळ्यांतील म्रुत मासे जाळण्यात येतात आणि त्याच्या भयंकर वासामुळे गावकऱ्यांचे आरोग्यमान खालावले आहे.


          जगभरातील बहुतेक सर्वच देशांनी हा भयंकर धोका लक्षात घेतमंगुर मत्स उत्पादन त्यांच्या देशात बंद केले आहे. भारतात ही २००० सालापासून राष्ट्रीय हरित प्राधिकरणा मार्फतमंगुर माश्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. असे असून देखील ठाणे जिल्ह्यात सर्रासपणे मंगुर माशांचे उत्पादन घेतले जात आहे. शासन दरबारी वारंवार तक्रारी करून देखील मंगुर मत्स्योत्पादन बंद होत नाही आहे. काही वेळेस शासनातर्फे छोट्या मोठ्या कारवाया देखील करण्यात आल्यापरंतु त्याने काहीही फरक पडला नाही. शासनाने व्यवस्थीत लक्ष घालून कारवाई केल्यास ही समस्या कायमची नष्ट होईल.


          भिवंडी तालुक्यातील कुंभारशिव गाव आणि आजूबाजूच्या गावांत मोठ्या प्रमाणात मंगुर माश्यांचे तळे आहेत. मंगुर मास्यांच्या उत्पादनास अखेर कोणाचे संरक्षण लाभले आहेका नेहमी फक्त दिखाव्या पुरता कारवाई होतेअसा प्रश्न ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे. मनसे चे दिनेश बेलकरे ह्यांनी नुकतेच ठाणे जिल्ह्याधिकारी आणि राष्ट्रीय हरित प्राधिकरणाला ह्या विषयी अवगत केले आहे. महिन्याभरात ही समस्या कायमची मार्गी लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments