राष्ट्रीय काँग्रेस माध्यमातून जिल्हा सरचिटणीस शामराव यादव यांनी केले "ई श्रम कार्ड"चे वाटप


डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत निळजे विभागात असंघटीत कामगारांना राष्ट्रीय काँग्रेसचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शामराव यादव यांनी "ई श्रम  कार्ड"चे वाटप केले. जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या हस्ते सुमारे २०० जणांना कार्डचे  वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ पलवा, लोढा हेवन आणि निळजे येथील असंघटित कामगारांनी घेतला. 

  
            काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित म्हणून हा कार्यक्रम भव्य स्वरूपात करण्याचे नियोजन शामराव यादव यांनी केले होते. परंतु अकस्मात सीडीएस जनरल प्रमुख बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वाढदिवस कार्यक्रम रद्द केले आणि कोणीही माझा वाढदिवस तसेच कार्यक्रम करू नये असे आदेश दिल्याने निळजे येथील भव्य कार्यक्रमाचे नियोजन रद्द करून फक्त असंघटित कामगारांना त्यांच्या "ई श्रम कार्ड"चे वाटप करण्यात आले.


        यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, काँग्रेसचे निळजे येथील जेष्ठ कार्यकर्ते गिरधर पाटील, मनोज यादव, अभिषेक मोहिले, प्रकाश नवलकर, मंगेश रूपे, विशाल रूपे, संकेत कांबळी, अनंत भोर, आकाश काटे, माया रूके, प्रशांत मोरे, चंदा यादव, सुजाता लवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान मार्गदर्शन करतांना पोटे म्हणाले, विभागातील नागरिकांच्या समस्या ओळखून त्यांना मदत करा तसेच महाआघाडी माध्यमातून नागरिकांसाठी होत असलेल्या कामांची माहिती सर्वांसमोर ठेवा. 


         यावर जिल्हाध्यक्ष यादव  यांनी त्यांच्या विभागातील असंघटित कामगारांना एकत्रित केल्याचे सांगून त्यांच्या अडीअडचणी सोडविल्या जात असतात. मात्र येथील जनतेच्या मुख्य गरजा म्हणजे पाणी, रस्ते आणि वीज असून यासाठी नागरिकांची दमछाक होत असल्याचे सांगितले. यासाठी पालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असून आता हा विषय उच्च पातळीवरून सोडविला पाहिजे असे पोटे यांना सांगितले. असंघटित कामगारांना "ई श्रम कार्ड" मिळण्याने त्यांना आता केंद्रीय तसेच राज्य सरकारच्या योजनांचा फायदा मिळेल असेही यादव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments