ट्रेलच्या ग्रँड ट्रिलियन सेल मध्ये पुरूषांच्या ग्रूमिंग उत्पादनांवर भरघोस सूट


मुंबई, २० डिसेंबर २०२१ : डिसेंबर हा फक्त उत्सवाचा महिना आहे. फक्त थंडीसाठीच नाही तर त्यासोबत येणाऱ्या सणांच्या आणि लग्नाच्या कालावधीमुळेही. तुम्ही तुमच्या आवडत्या ब्रँड्सकडून केस, त्वचा आणि दाढीसाठी चांगली ग्रूमिंग उत्पादने शोधत असल्यास ट्रेलचा दि ग्रँड ट्रेलियन सेल २० डिसेंबरपर्यंत सर्वोत्तम दर्जाची उत्पादने खरेदी करण्यासाठी सुरू आहे. या सेलमध्ये बॉम्बे शेव्हिंग कंपनी, दि मॅन कंपनी, उस्त्रा, बियर्डो अशा विविध उत्पादनांमध्ये पुरूषांच्या ख्यातनाम ब्रँड्सवर ५५ टक्क्यांपर्यंत आकर्षक सवलती दिल्या जातील.


       ट्रेलच्या वापरकर्त्यांना आपल्या आवडत्या ग्रूमिंग ब्रँड्सकडून विविध उत्पादनांवर खालील सवलती मिळवता येतील. जसे दाढी आणि मिशीचे तेल, लोशन्स, ट्रिमर्स, शॅम्पू, क्लिंझर्स आणि फेशियल किट्स इत्यादी.


           ट्रेलने आपले इन-एप चलन ट्रेल कॅशही आणले आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना संपूर्ण कार्टवर अधिक सवलती मिळवता येतील. प्रत्येक ट्रेल कॅश ही भारतीय रूपयांच्या मूल्याच्या समकक्ष आहे. ट्रेलकडील या खास घटकामुळे वापरकर्त्यांना अ‍ॅपवर विविध कार्ये करण्यासाठी पुरस्कृत केले जाते. जसे व्हिडिओ पाहणे, अ‍ॅपवर मित्रांना आमंत्रित करणे, ट्रेल शॉपवर खरेदी करणे आणि त्याबदल्यात त्यांना ट्रेल कॅशचा वापर करून अ‍ॅपवर खरेदी करणे शक्य होते.


     ग्रँड ट्रेलियन सेलमुळे १०० दशलक्षपेक्षा अधिक वापरकर्त्यांना फॅशन, आरोग्य आणि कल्याण, सर्वोत्तम सुगंध, ब्युटी, ग्रूमिंग आणि पर्सनल केअर वर्गवारींमध्ये ट्रेल शॉपमध्ये १००० पेक्षा अधिक ब्रँड्सवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल. या सेलमध्ये डील्स ऑफ दि डे आणि फ्लॅश सेल्सही आकर्षक ऑफर्ससह समाविष्ट असतील. ग्राहक दर रात्री सर्वोत्तम ऑफर्स आणि डील्स मिळवण्यासाठी ट्रेल शॉपवर लक्ष ठेवू शकतात.


          ऑगस्ट २०२० मध्ये ट्रेलने शॉप सेक्शनला सुरूवात केली आणि त्याद्वारे सोशल कॉमर्स क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्याकडे ब्युटी, वेलनेस, फॅशन आणि मॉम आणि बेबी केयर क्षेत्रात १००० पेक्षा जास्त ब्रँड्स आहेत.

Post a Comment

0 Comments