अॅग्रीबझारचे व्हर्च्युअल पेमेंट सोल्यूशन 'अॅग्रीपे'

इन-हाऊस व्हर्च्युअल पेमेंट असणारे पहिले ऑनलाइन कृषी-व्यापार व्यासपीठ ~


मुंबई, २ डिसेंबर २०२१ : अॅग्रीबझार या भारतातील आघाडीच्या फुल-स्टॅक अॅग्रीटेक कंपनीने व्यासपीठावर व्यवहार करताना युजर्सना (ग्राहक व विक्रेते) अतिरिक्त सुरक्षितता व सुधारित सोयीसुविधा देण्यासाठी त्यांचे व्हर्च्युअल पेमेंट सोल्यूशन व्यासपीठ 'अॅग्रीपे'मध्ये सुधारणा केली आहे.


         अॅग्रीबझारवरील व्यापारामध्ये ग्राहक व विक्रेत्यांसाठी अर्नेस्ट मनी डिपॉझिट (ईएमडी) / सिक्युरिटी डिपॉझिट (एसडी) यांचा समावेश आहे, ज्यामुळे व्यापार प्रक्रियेदरम्यान कोणलाही अडथळा न येण्याची खात्री मिळते. ज्यामुळे युजरला अधिक सर्वोत्तम अनुभव मिळतो. युजर्स अॅग्रीपे खात्यामध्ये त्यांचे पैसे सुलभपणे डिपॉझिट करू शकतात आणि विविध व्यापार व्यवहार करण्यासाठी त्या पैशांचा वापर करू शकतात.


         कोणत्याही अडथळ्यामुळे किंवा इतर कारणांमुळे व्यापार अयशस्वी ठरला तर युजर्सना त्वरित परतावा मिळेल. युजर्समध्ये विश्वास निर्माण करणे आणि त्यांना कार्यक्षमपणे व्यवहार करण्यामध्ये सक्षम करणे हा या व्यासपीठाच्या लाँचमागील उद्देश आहे. अॅग्रीपेच्या माध्यमातून ते कोणत्याही वेळी त्यांच्या व्यवहारांना ट्रॅक करू शकतात, ज्याद्वारे ते व्यवहारांदरम्यान उत्तम कार्यक्षमता व पारदर्शकतेचा आनंद घेऊ शकतात. वैशिष्ट म्‍हणजे अॅग्रीपे मोफत आहे आणि ०.००००८ टक्‍के इतक्या कमी त्रुटी दरासह उच्‍च अचूक व्यवहाराची खात्री देतो.


         अॅग्रीबझारचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित अग्रवाल म्‍हणाले, "भारतात, विशेषत: कृषी क्षेत्रात देखील डिजिटल पेमेंट्स अवलंबतेमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसण्यात आली आहे. ही जलद, विश्वसनीय प्रक्रिया आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे युजर्सना प्रत्यक्ष बँकांमध्ये जावे लागत नाही. अॅग्रीबझार अॅपचा वापर करत युजर्स बँक किंवा कार्ड माहिती शेअर करण्याऐवजी त्यांच्या अॅग्रीपे खात्यामध्ये विनासायास पैसे डिपॉझिट करू शकतात. 


        आम्ही आशा करतो की, हे सोल्यूशन पारंपारिक पेमेंट्स यंत्रणेला एक-थांबा पेमेंट मार्गामध्ये रूपांरित करेल, जो ग्राहक व विक्रेत्यांना उच्च सुरक्षा व सुरक्षिततेसह विनासायास व्यवहार करण्यामध्ये सक्षम करेल."

Post a Comment

0 Comments