मनसे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांच्या तर्फे विविध लोकोपयोगी कार्यक्रम संपन्न


कल्याण, प्रतिनिधी  : मनसे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी रविवारी प्रभाग क्रमांक ३६ येथे आरोग्य शिबीरसार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय आणि जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आदी विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.


कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका कधी ही जाहीर होऊ शकतात आणि त्या साठी सर्व राजकीय पक्ष मोर्चे बांधणी साठी कार्य करीत आहेत. पण एका दिवसात एकाच प्रभागात तीन कार्यक्रम करून ह्या वेळी महापालिकेच्या निवडणुकीत मनसेची भूमिका निर्णायक असण्याची ग्वाही रुपेश भोईर यांनी दिली आहे. रविवारी सकाळी सर्वात आधी मनसे तर्फे रहेजा कॉम्प्लेक्स येथील डॉक्टर हाऊस येथे महापालिकेचे प्रथम स्थायी समिती सभापती कै. चंद्रकांत भोईर यांच्या पुण्यतिथी निमित्त आध्या हेल्थ केयर यांच्या सहयोगाने मोफत  आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले या शिबिराचा तीनशे हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला.


 त्यानंतर सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार कर्ण हिंदुस्तानी यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी रुपेश भोईर यांच्या जनसंपर्क,कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आलेया प्रसंगी मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर व अन्य नेते मंडळींची उपस्थिती होती सोबतच स्थानीय नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. तसेच रहेजा येथील वाणी विद्यालय या शाळेतील गुणवंत विद्य्यार्थ्यांचा गौरव देखील यावेळी करण्यात आला.


आपले मनोगत व्यक्त करताना रुपेश भोईर म्हणाले की, जनतेसाठी काम करताना मला आनंद होतो आणि आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी असल्याने आज कार्यक्रम केले आहेत. माझे वडील कै चंद्रकांत भोईर नेहमी सांगायचे की जनते साठी कार्य करताना दिवस रात्र बघायचे नाही. म्हणून मी माझ्या घरातच कार्यालय सुरू केलं असून नागरिकांसाठी मी चोवीस तास उपलब्ध असणार असल्याचे रुपेश भोईर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments