भिवंडीत मोबाईल टॉवर वर कारवाई करण्यात पालिका प्रशासनाची कुचराई

 


भिवंडी :दि.16 (प्रतिनिधी )  भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट असतानाच एक मोबाईल टॉवर उभारणाऱ्या कंपनीने रस्त्यावर अतिक्रमण करीत टॉवर उभारल्याचा प्रकार समोर आला आहे .


         शहरातील प्रभाग समिती क्रमांक एक अंतर्गत नागांव -2 येथील सर्व्हे क्रमांक 91/14 जब्बार कंपाऊंड 
येथील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करीत 10 बाय 10 मोजमापाचा काँक्रीट चौथरा उभा करून त्यावर मेसर्स इंडस टाॅवर लिमिटेड व हयातुल्ला तजमुल खान ‌यांनी संगनमत करून 40 फूट उंचीचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे .


         सूत्राने दिलेल्या माहिती नुसार या मोबाईल टॉवर उभारणीच्या कामात पालिका अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचे बोलले जात आहे .हा प्रकार उघडकीस आल्या नंतर कुंभाकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने कारवाई करण्याचे नाटक करीत एक डिसेंबर रोजी घाईघाईत मोबाईल टॉवर उभारणारी कंपनी व जमीन मालक यांना नोटीस बजावत 15 दिवसात सदरचे अनधिकृत टॉवर काढून टाकावेत असे आदेश बजावले .परंतु त्या नंतर कोणतीही कारवाई प्रस्तावित केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

Post a Comment

0 Comments