महापरिनिर्वाण दिनी केडीएमसीचे बाबासाहेबांना अभिवादन


कल्याण , प्रतिनिधी  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कल्याण पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उदयानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.त्याचप्रमाणे  महापालिका,मुख्यालयातही  महापालिका आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी  यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. या समयी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवारसहा. संचालक,  नगररचना दिक्षा सांवतमुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळेमाजी महापौर रमेश जाधवमाजी नगरसेविका सारिका जाधवउप आयुक्त विनय कुलकर्णीविभागप्रमुखजनसंपर्क संजय जाधवसहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचेउप सचिव किशोर शेळके,  सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आणि इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यासमयी  मोठया संख्येने उपस्थित होते.


 

डोंबिवली विभागीय कार्यालयातही विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत यांनी डोंबिवली विभागीय कार्यालयालगतच्या पुर्णाकृती पुतळयास तसेच कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यासमयसी  सहा आयुक्त भरत पाटीलसहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments