रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टतर्फे वांगणीत वैद्यकीय शिबिराचे आयोजन


डोंबिवली ( शंकर जाधव ) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, रोटरॅक्ट क्लब ऑफ के.व्ही.पेंढरकर महाविद्यालय, रोटरी कम्युनिटी कॉर्पस् ओफ् बालेवाकळन व साकडबाव
आणि नंदनवन महिला प्रभाग, वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानेमहावैद्यकीय आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर वांगणी येथील अरुण भोईर ह्यांच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. 

    
         आरोग्य शिबिरामध्ये खास करून महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, स्त्रियांचे आजार इत्यादी आजारांचे निदान करून त्यांना त्याबाबतचे मार्गदर्शन देण्यात आले. तसेच सर्वांसाठी डोळ्यांची तपासणी व मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम रोटरी इंटरनॅशनलच्या डिसेंबर महिन्यासाठी अंतर्भूत असलेल्या 'Disease Prevention and Treatment' ह्या सदराखाली राबवण्यात आला होता. ह्या शिबिरात २०० हून अधिक लाभार्थी शामिल झाले होते. हे शिबीर सकाळी १० ते ४ पर्यंत ह्या वेळेत संपन्न झाले. 


          ह्या शिबिरासाठी रोटरी अध्यक्ष विरेन्द्र पाटील, प्रकल्प प्रमुख दिलीप भगत, रोटरॅक्ट अध्यक्ष बिपाशा शर्मा, मा.सचिव शैलेश गुप्ते,  आर.सी.सी. अध्यक्ष डॉ. मनोहर भोईर, अध्यक्ष प्रज्ञा ठोसर , नंदनवन महिला प्रभाग तसेच वरील सर्व संस्थांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून विशेष मेहनत घेतली. डॉ. मयुरेश वारके मंडल प्रमुख, रोटरी इंटरनेशनल मंडल ३१४२ ह्यांचे सदर शिबिरासाठी मार्गदर्शन लाभले. रोटरी क्लब डोंबिवली वेस्ट च्या पूर्वाध्यक्षा दिपाली पाठक व सदस्य मंदार ठाकूर, रोट्रॅक्ट क्लबचे वृषभ झगडे ह्यांचे देखील बहुमोल सहकार्य शिबिरास लाभले.


         सदर शिबीर सुरु असताना वांगणी शहरातील अनेक मान्यवरांनी शिबिरास भेट दिली. ह्या शिबिरासाठी डॉक्टरांचे पथक डॉ. सुदर्शन पाटील,सदस्य ह्यांनी उपलब्ध करून दिल्याबद्धल त्यांचे विशेष आभार मानले. ह्याप्रसंगी समारोपाच्या वेळी सौ.प्रज्ञा ठोसर ह्यांनी असे शिबीर वारंवार आयोजित करण्याची विनंती रोटरी क्लब डोंबिवली वेस्ट ह्यांना केली व त्यानंतर आभार प्रदर्शनाने शिबिराची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments