गावठी दारू निर्मितीची हातभट्टी गुन्हे शाखेने केली उध्वस्त नवसागर मिश्रित रसायन गुन्हे शाखेने केले नष्ट


कल्याण , कुणाल म्हात्रे :  शहरी आणि ग्रमिण भागात गावठी दारूला मागणी असल्याचे दिसून येत आहे. कल्याण जवळील असलेल्या मलंगगड भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती केली जात असल्याचे समजते त्यामुळे आता दारूच्या कारवाईसाठी  गुन्हे शाखेने पुढाकार घेतला आहे. मलंगगडच्या मांगरूळ गावात नवसागर मिश्रित रसायन आणि साहित्य गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.गावठी दारूची मागणी पुन्हा एकदा वाढली आहे. त्यामुळे दारूचा पुरवठा झाल्यास गुन्हेगारी अधिक वाढण्याची भीती हि व्यक्त केली जात आहे. एकीकडे ग्रामीण भागासह शहरी भागात देखील हाणामारी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे आता  गुन्हे शाखेने पुढाकार घेतला असून सध्या दारूचा पुरवठा करणाऱ्या भट्ट्यांच्या मुळाशी घाव घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कल्याण जवळील मांगरूळ गावाच्या शिवारातील १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल गुन्हे शाखेला मिळून आला आहे.याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात कैलास जयराम पाटील आणि श्रीपत जाधव यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दारू निर्मितीसाठी लागणारे सतेले आणि एक चाकू रबरी नळी देखील मिळाली आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्वस्त मिळणाऱ्या हात भाट्यांकडे गुन्हे शाखेने आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे दारू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.      

Post a Comment

0 Comments