कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी खारीगाव आर ओ बी ब्रिजचा पाहणी दौरा केला.

 


कळवा , अशोक घाग :  कळवा पूर्व आणि कळवा पश्चिमेला जोडणारा वाहतुकीच्या पुलाच काम आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. आज कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी नगरसेवक उमेश पाटील नगरसेविका विजया लासे नगरसेवक गणेश कांबळे माजी उपमहापौर मनोज लासे विभाग प्रमुख नंदकुमार पाटील खासदार रेल्वे समिती सदस्य विजय देसाई रोहन शिंदे नगरसेविका मंगला कळंबे उल्हास हळदणकर वैभव शिरोडकर मुकुंद ठाकूर राजेश विराळे आणि रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी या ब्रिजचा पाहणी दौरा केला. 


         येत्या नववर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीचा रेल्वे क्रॉसिंग फाटक बंद होऊन हा ब्रिज नागरिकांसाठी खुला होणार असल्याचे आश्वासन यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे.   याआधी ठाकुर्ली आणि कल्याण येथील एफओबी ब्रिज सुरू करून रेल्वे क्रॉसिंग फाटक बंद करण्यात आले होते त्यानंतर आता येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कळव्याचा फाटक देखील बंद होणार आहे आणि सगळ्यात अंतिम टप्प्यामध्ये दिव्याचा फाटक बंद करण्यात येईल असेही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले..            काम सुरू असलेली सर्व फाटक यंत्रणा बंद झाल्यानंतर रेल्वेचे थांबे कमी होऊन रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढणार असल्याचे खासदारांनी सांगितले. त्याच बरोबर दिवा ते ठाणे या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गीकेसाठी रेल्वेकडून तिसरा मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला 2016 नंतर गती मिळाली आणि ते येत्या फेब्रुवारीपर्यंत हे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करून कार्यरत करण्याचा रेल्वेच टार्गेट असल्याचं या वेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल आहे. 


            भविष्यात पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम, आरओबी आणि एफओबी ब्रिज पूर्णपणे तयार झाल्यानंतर रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढेल, स्लो, फास्ट, मेल आणि एक्सप्रेस साठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील, ठाणे ते कल्याण रेल्वे वाहतूक शटल पद्धतीने सुरू होतील, कुठलीही सिग्नल यंत्रणा लागणार नाही, कुठलाही रेल्वे क्रॉसिंग अपघात होणार नाही, एक्सप्रेस गाड्यांमुळे खोळंबा होणार नाही आणि प्रवाश्यांना त्रास होणार नाही असे देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले..

Post a Comment

0 Comments