कल्याण शिळफाटा रस्त्यातील बाधितांनी घेतली एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची भेट

■बाधितांच्या झाडे व मालमत्तांचे मुल्यांकन करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे प्रांत अधिकाऱ्यांना निर्देश...

  

कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण शिळफाटा रस्त्यातील बाधीतांना मोबदल्याच्या अनुषंगाने भूसंपादनाच्या प्रक्रियेतील कमतरतेमुळे होत असलेल्या विलंबामुळे बाधीत जमीन मालकांनी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली. यांसदर्भात एमएसआरडीसी  प्रशासनाने कल्याण व ठाणे प्रांत अधिकारी यांना पत्र काढून झाडे व मालमत्तांचे मुल्यांकन करून संपूर्ण संयुक्त मोजणी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत. या पत्रानूसार संयुक्त मोजणी झालेल्या गावांच्या मोजणी अहवालात झाडे व मालमत्तांचे मुल्यांकन करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी दिली.


महाराष्ट्र शासनाने भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्यावर वाहतुक वर्दळ मध्ये वाढ झाल्यामुळे सहापदरी रुदीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास दि.१९.०८.२०१६ रोजीच्या शासन निर्णय अन्वये कार्यान्वयोन यंत्रणा म्हणून घोषित केले. त्यानंतर दिनांक १३,०६,२०१७ रोजीच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये व दिनांक २४.११.२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये हा प्रकल्प ईपीसी तत्वावर हाती घेण्यास व या प्रकल्पास प्रशासकोस मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्याचे सहापदरी संदीकरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कल्याण तालुक्यातील जमीनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारीठाणे यांना सादर करण्यात आला होता.


जिल्हाधिकारीठाणे यांनी हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी कल्याणच्या प्रांत अधिकाऱ्यांना  पाठविला होता. याबाबत काही भूधारक शेतकरी/रहिवाशी यांच्या तक्रारी या एमएसआरडीसी कार्यालयास प्राप्त होत आहेत कीकल्याण तालुक्यातील संयुक्त मोजणीची कार्यकाही उप विभागीय कार्यालयकल्याण यांच्या कडून प्रगतीपथावर आहे. परंतु उप विभागीय कार्यालयाने कल्याण तालुक्यातील सहापदरी रुंदकरणासाठी आवश्यक असणाऱ्या संयुक्त मोजणीच्या भूसंपादन अहवाल तयार करतांना झाडांचे मूल्यमापन व मालमत्तेचे मूल्यमापन समाविष्ट केलेला नाही.


तरी संयुक्त मोजणीच्या भूसंपादन अहवालमध्ये झाडांचे मूल्यमापन व मालमत्तेचे मूल्यमापन समाविष्ट करून संयुक्त मोजणीचा भूसंपादन अहवाल या सर्व बाबी लक्षात घेता भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्याचे सहापदरी रुदीकरण करण्यासाठी आवश्यक असणा-या कल्याण तालुक्यातील संयुक्त मोजणीच्या भूसंपादन अहवालमध्ये झाडांचे मूल्यमापन व मालमत्तेचे मूल्यमापन समाविष्ट करुन जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता नितिन बोरोले यांनी उप विभागीय अधिकारी कल्याण विभाग आणि ठाणे उपविभाग यांना दिले आहेत.


       कल्याण-शिळफाटा रस्त्यातील बाधीत जमीनमालकांना मोबदला देण्याच्या अनुषंगाने एमएसआरडीसी कडून प्रस्ताव सादर झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून संयुक्त मोजणी करण्यात आली. परंतु या मोजणी अहवालात बाधीत झाडे आणि मालमत्तांचा उल्लेख नसल्यामुळे या स्थावर मालमत्तांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुल्यांकन केले जात नाही. या रस्त्यातील काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु येथील बाधीतांना मोबदला देण्याबाबत वेगवेगळ्या कारणांमुळे विलंब केला जात आहे. त्यामुळे जोपर्यंत बाधीतांना मोबदला अदा केला जात नाही तोपर्यंत खाजगी जमीनीतील रस्त्याच्या कामाला हरकत असेल असी प्रतिक्रिया येथील बाधित जमीनमालक आणि सर्व पक्षीय युवा मोर्चाचे गजानन पाटील यांनी दिली आहे. 


           दरम्यान याबाबत कल्याणचे उप विभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांना विचारले असता, कल्याण शिळफाटा रस्त्यातील बाधितांच्या झाडे आणि मालमत्तांचे मुल्यांकन करण्याचे पत्र दिले असून काही भागात हे मुल्यांकन झाले असून काही ठिकाणी बाकी आहे. याबाबत ९ तारखेला बैठक बोलावली असून ज्यांचे मुल्यांकन बाकी आहे त्यांचे मुल्यांकन करून त्यांना मोबदला दिला जाईल असे सांगितले.    

Post a Comment

0 Comments