हर्ष पालांडेचे धडाकेबाज शतक

 


डोंबिवली , प्रतिनिधी : हर्ष पालांडेचे धडाकेबाज शतक आणि पियुष कनोजियाच्या अचूक गोलंदाजीमुळे डोंबिवली बॉईज सीसीडी एकादश संघाचा ८ विकेट्स राखून पराभव करत क्रिकेट इन्स्टिट्यूशन ऑफ डोंबिवली आयोजित मर्यादित ४० षटकांच्या सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा मोठा विजय नोंदवला. निळजे येथील हभप मारुतीबुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगणावर खेळल्या गेलेल्या सामन्यात सीसीडी एकादश संघाने प्रथम फलंदाजी करताना १८४ धावांचे आव्हान प्रतिस्पर्धी संघासमोर उभे केले. 


         अद्वैत गोळेने ५४ धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. पियुषने २० धावांत ३ तर सिद्धांत भालेराव आणि क्रिषणा पाटीलने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या. विजयाचे आव्हान डोंबिवली बॉईज संघाने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात १८९ धावा करत पूर्ण केले. हर्ष पालांडेने नाबाद १०६ धावा करताना नऊ चौकार आणि पाच षटकार ठोकले. 


         शंतनू नायकने ३९ धावा केल्या. शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या हर्षला कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक प्राजक्त पोतदार यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Post a Comment

0 Comments