फ प्रभागात प्रतिबंधित प्लॉस्टिक पिशव्या जप्त करण्याची धडक कारवाई

 


कल्याण , प्रतिनिधी  : प्लॉस्टिक पिशव्यांमुळे होणारी पर्यावरणाची होणारी हानी टाळण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रभागामार्फत प्रतिबंधित प्लॉस्टिक पिशव्या जप्त करण्याची धडक कारवाई केली जात आहे.
 

       त्या अनुषंगाने फ प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर शेळके यांनी प्रभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक शरद पांढरे, आरोग्य निरिक्षक दिलीप भोईर, अमोल पवार यांच्या समवेत डोंबिवली पूर्व, छेडा रोड येथील जय भैरवनाथ इलेक्ट्रीकल यांच्याकडील 7 किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करुन त्यांचेकडून रुपये 5 हजार दंड आकारण्यात आला.

Post a Comment

0 Comments