भिवंडीत मूलभूत हक्कांसाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा निर्धार मोर्चा


भिवंडी दि 28 (प्रतिनिधी ) देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना दऱ्याखोऱ्यात राहणार भूमीपूत्र आदिवासी समाज आज ही आपल्या मूलभूत हक्कां पासून वंचित असल्याने त्या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालया वर निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .


         नदीनाका येथील लोकमान्य टिळक विसर्जन घाटावरून सुरू झालेल्या मोर्चास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असताना बंदी आदेश झुगारून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा ,सरचिटणीस बाळाराम भोईर ,प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर,जिल्हाध्यक्ष अशोक सापटे ,जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद पवार ,तालुकाध्यक्ष सुनील लोणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्च्यात शेकडोंच्या संख्येने स्त्री पुरुष सहभागी झाले होते .


         जाहीर केलेला इको सेनसिटीव्हीटी झोन रद्द करा ,आदिवासी गरिबांना अंत्योदय योजनेचा लाभ द्या ,ऑनलाईन नोंदणी न झालेल्या शिधापत्रिका धारकांना ऑफलाईन धान्य द्या ,वनहक्क जमिनीचे दावे तात्काळ निकाली काढून आदिवासींना  जमिनीचे वाटप करा ,शेतीसाठीची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नावे करा ,आदिवासी पाड्यांना वीज पाणी रस्ता या मूलभूत सुविधा उपलब्ध करून घ्या अशा विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांना दिले.दरम्यान हा मोर्चा मुळे मुख्य रहदारीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

Post a Comment

0 Comments