लजीवनदीप महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी आशियाई स्पर्धेत मिळविले घवघवीत यश


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील गोवेली येथील जीवनदीप कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांनी तुर्की येथे २४ ते ३० डिसेंबर अखेर पर्यत होणाऱ्या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश मिळवून कल्याणच्या ग्रामीण भागाचे   नाव जागतिक स्तरावर चमकवले आहे.


              या आशियाइ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गोवेली महकविद्यालयाचा  अमन सिंघ   (एस.वाय बीए) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी  रौप्य पदक   पटकावले आहे. तर एफ.वाय बीए मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या  रसिका अवेरे या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक पटकावले आहे.  एम.ए मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या  सागर मिराशी  यांनी  कांस्य पदक पटकावले आहे.  ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे  व प्राचार्य डॉ. के.बी कोरे  यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments