डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगर पालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांबाबत पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.३ महिन्यात शहरांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करू असे सांगितले.यावर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी आयुक्तांवर खरमरीत टीका केली.
पालिका आयुक्त नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे काम करत असून करोना काळात प्रशासनाने आरोग्य कृती आराखडा कधी बनवणार असा सवालहि उपस्थित केला.तसेच विकास कसा करायचा असेल तर वेंगुर्ला नगरपालिकेच्या हद्दीतील विकास कामे येथील अधिकाऱ्यांनाही पहिले पाहिजे असेही सांगितले.
वेंगुर्ला नगरपरिषदेचा विकास पॅटर्न केडीएमसीने राबवावा अशी मागणी करत येथील गेल्या पाच वर्षात विकासाचे व्हिजन कागदावरून प्रत्यक्षात कसे करून दाखवायचे याचा आदर्श म्हणजे हि नगरपरिषद असल्याचे आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.व्हिजन असल्यास अनेक विकास कामे पूर्ण होत असून केडीएमसीतील अधिकाऱ्यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विकास कामांची पाहणी करावी असा सल्ला आमदार चव्हाण यांनी दिला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांबाबत पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ३ महिन्यात शहरांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याबाबत पत्रकारांनी आमदार चव्हाण यांच्या प्रतिक्रिया विचारल्या असता ते म्हणाले, पालिका आयुक्त नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे काम करत आहेत.करोना संकटात पालिका आयुक्तांनी आरोग्य कृती आराखडा तयार करावा मात्र त्याकडे का लक्ष नाही असा प्रश्न उपस्थित केला.
चौकट
शिवसेनेच्या खासदारांना योग्य वेळी उत्तर देऊ...
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी संसदेत मोदी सरकारबाबत भाष्य केल्यासंदर्भात पत्रकारांनी आमदार चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, खासदार डॉ. शिंदे यांना संसदेच्या अधिवेशनात अन्य खासदारांनी उत्तर दिले आहे.
मोदि सरकारने कोणत्या विकास कामांवर किती निधी खर्च केला केल्याची माहिती योग्य वेळी जनतेला दिली जाईल. ज्याप्रमाणे केंद्राकडे जलवाहतुकीसाठी निधीची चौकशी केली तशी शहरातील ४३२ कोटी विकास कामांच्या निधीसाठी राज्यातील नगरविकास मंत्र्यांकडे विचारणा केली पाहिजे असेहि आमदार चव्हाण म्हणाले.
0 Comments