कल्याण, प्रतिनिधी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ६७ वे राष्ट्रीय अधिवेशन २४ ते २६ डिसेंबर रोजी राणी दुर्गावती नगर, जबलपूर येथे पार पडले. या अधिवेशनामध्ये नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित झाली.
यात अभाविप ठाणे विभाग संघटन मंत्री व पूर्व कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून निवड झाली आहे. आज कल्याण रेल्वे स्थानक येथे कल्याण जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
0 Comments