महाराष्ट्र राज्य शिवराज्य ब्रिगेडची ठाणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर

■महाराष्ट्रातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर लढा उभारण्यासाठी शिवराज्य ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय राहणार...


कल्याण  , प्रतिनिधी  :  विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श घेत समाजाला अभिप्रेत अशी समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्यनिती अवलंबली. समाजकारण हेच राजकारण हे शिवसुत्र घेवून एक नवी व लोकशाहीला खरे स्वरुप असलेली समाज जागृत व्यवस्था व राज्यव्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प शिवराज्य ब्रिगेडने केला आहे. 


          छत्रपतींचे स्वराज्य हे प्रत्येक व्यक्तीला आपलेसे वाटणारे राज्य होते ते खऱ्या अर्थाने आताच्या स्थितीत कसे सत्यात उतरेल यासाठी प्रयत्नशिल राहणे हा शिवराज्य ब्रिगेडचा मानस आहे.  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल  जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात दौरा घेवून इतर जिल्हा बांधणी सुरूवात करून संघटन मजबूतीकरणावर भर दिला जात आहे . त्याच प्रमाणे ठाणे जिल्ह्यातील कार्यकारिणी २३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. 


              यामध्ये शिवराज्य ब्रिगेड ही शिक्षण, आरोग्य , बेरोजगारी ,महिला सक्षमीकरण , तरुणांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी उद्योग, व्यवसाय ,स्पर्धा - परीक्षा हे विषय घेऊन भविष्यात मर्गिकरण करणार आहेत . महाराष्ट्रातील तरुणांना अमोल जाधवराव यांनी आवाहन केले आहे या विचारांशी सहमत तरुणांनी शिवराज्य ब्रिगेडने सहभागी होण्यासाठी पुढे यावे. यातून स्थानिक जिल्हा राज्य स्थरीय विषय सोडविण्यासाठी आपण सर्व एकत्रित लढू .


              त्यावेळी शिवराज्य ब्रिगेड महाराष्ट्र मुख्य समन्वयक पदी सुभाष गायकवाड, महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी सुजय हुले, महाराष्ट्र संघटक पदी सत्यविजय शेट्टी, तर कोकण विभाग प्रमुख पदी शरद गवळी, ठाणे जिल्हा प्रचार प्रसार प्रमुख पदी अक्षय शिंदे, ठाणे महानगर प्रमुख पदी सचिन विनायक मोरे, ठाणे महानगर संघटक पदी प्रकाश शेलटकर, ठाणे महानगर उपप्रमुख पदी प्रतिक यशवंत सपकाळ, कल्याण डोंबिवली महानगर पदी प्रथम भगवान गायकवाड, कल्याण डोंबिवली महानगर कार्याध्यक्ष पदी अक्षय संजय पाटील यांची निवड करण्यात आली. 



            यावेळी शिवराज्य ब्रिगेड महाराष्ट्र अध्यक्ष अमोल  जाधवराव, महाराष्ट्र संघटन प्रमुख दत्ता भाऊ चव्हाण, प्रचार प्रसार प्रमुख सचिन कळझुनकर, महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय आंबेरकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निवडी करण्यात आल्या. सदर वेळी ठाणे जिल्हा प्रमुख समीर देसाई,  मुंबई विभागिय प्रमुख अक्षय चव्हाण, रत्नागिरी जिल्हा प्रमुख मंगेश साळवी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

        यावेळी कर्नाटक बेंगरुळ येथील काही समाजकंटकानी छ्त्रपती शिवरायांच्या स्मारकावर शाहिफेक करून विटंबना केली आहे छ्त्रपती शिवराय हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे आराध्य दैवत आहे . अश्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हा दाखल झाला तर अश्या विकृतीला आळा बसेल असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल जाधवराव यांनी केले.

Post a Comment

0 Comments