राज्यस्तरीय एड्स नियंत्रण संस्थेच्या स्पर्धेमध्ये एस. एस. टी. महाविद्यालयाने पटकावला पहिला क्रमांक


कल्याण, प्रतिनिधी  : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत एड्स या रोगावर मात करण्यासाठी तसेच त्याबद्दल असलेली मानसिकता बदलण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अशात या स्पर्धेमध्ये एस. एस. टी. महाविद्यालयाने देखील उत्फुर्त सहभाग नोंदवला आणि घवघवीत यश देखील मिळवलं. अंकिता भोईर या विद्यार्थिनीने अगदी सुबक अशी एड्स संबंधी मोलाचा संदेश देणारी रांगोळी साकारली होती.


         तिची कला आणि तिचा संदेश पाहता तिला पहिला क्रमांक देण्यात आला.  या स्पर्धेमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकवल्याने संपूर्ण एस. एस. टी. महाविद्यालयाची मान देखील अभिमानाने उंचावली आहे. तसेच अंकितावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments