खऱ्या नेत्यांमध्ये सर्वांना पुढे घेऊन जाण्याची क्षमता - सतीश फडके


डोंबिवली ( शंकर जाधव )कल्याण भिवंडी बायपास येथे सीसीएलतर्फे सतीश फडके यांचे व्याख्यान क्रिएटिव्ह लीडर फाउंडेशन द्वारा संचलित कॉलेज ऑफ क्लबच्या वतीने `द लीडर आर बोर्न नॉट मेड ?`कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात अकोला येथील फडके ॲकॅडमीचे मुख्य मार्गदर्शक सतीश फडके विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.    द लीडर आर बोर्न नॉट मेड ? एखादा व्यक्ती जन्मतः लीडर नसतो तो परिस्थितीनुसार लीडर होत असतो या विषयावर उपस्थितांशी संवादात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,तुम्हाला तुमचे नेतृत्व विकसित करायचे असेल तर दूरदृष्टी महत्त्वाकांक्षा निर्भयपणा असणे आवश्यक आहे.खरा नेता हा त्याच्या इतर आणि यांचा विचार करतो.त्याचाही आपल्या गोटात सामील करून पुढे नेत असतो.असाच नेता हा जीवनात यशस्वी होतो.खऱ्या नेत्यांमध्ये सर्वांना पुढे घेऊन जाण्याची क्षमता असते.         या कार्यक्रमात सतीश खडके यांचा परिचय डॉक्टर ऐश्वर्या मोरे यांनी करून दिला.या कार्यक्रमात कॉलेज क्लब अध्यक्ष लीडर्सचे अध्यक्ष उमेश चव्हाण,रोटरी जिल्हा ३१४२ चे भावी प्रांतपाल ( सन २३-२४ ) चे रो. मिलिंद कुलकर्णी संस्थेचे पितामहा प्रितपाल सिंग भाटीया,कन्वेनर सुरेश अय्यर उपस्थित होते. अध्यक्ष उमेश चव्हाण हे एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांचा अनेक सामाजिक संस्थांची संबंध आहे. रोटरी जिल्हा ३१४२ च्या अनेक महत्वाच्या  पदांची जबाबदारी त्यांनी अतिशय उत्तमरित्या सांभाळली आहे.

 

Post a Comment

0 Comments