रिक्षात विसरलेला मोबाईल परत मिळालाडोंबिवली ( शंकर जाधव ) प्रामाणिक रिक्षाचालक आणि वाहतूक पोलिसांमुळे मोबाईल परत मोबाईलच्या मालकाने त्यांचे आभार मानले. डोंबिवलीत एका प्रवासी रिक्षात आपला मोबाईल विसरला होता.रिक्षात उतरल्यावर काही वेळेने प्रवाश्याला आपण रिक्षात आपला मोबाईल विसरल्याचे लक्षात आले.मात्र त्याने रिक्षाचा नंबर घेतला नसल्याने रिक्षा शोधायची कशी असा प्रश्न पडला. 


        परंतु प्रामाणिक रिक्षाचालक विकास सुळे हे कल्याणला जात असताना कोळसेवाडी शहर वाहतूक शाखेचे पोलीस नाईक राजेंद्र चौधरी आणि  महिला पोलिस रुपाली माने आणि वॉर्डन मेहबूब तडवी यांच्या ताब्यात दिला.पोलिसांनी मोबाईल मालकाचा शोध घेऊन मोबाईल त्याच्या स्वाधीन केला.

Post a Comment

0 Comments