राज्यपालांच्या हस्ते डॉ. अमिता कुकडे यांचा सन्मान
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजकार्यासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातील २८ महिला डॉक्टरांना नुकतेच राजभवन येथे 'मेडीक्क्विन एक्सलन्स ' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यामध्यें कल्याणच्या डॅाक्टर अमिता कुकडे यांचा सन्मान करण्यात आला. 


             डॅा. अमिता कुकडे या गेली ३० वर्षे कल्याणमध्ये वैद्यकीय व्यवसाय करीत असून त्याचवेळी त्या  समाजकार्याची आवडही जोपासत आहेत. त्या अनेक समाजिक संस्था शी जुळलेल्या आहेत़. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना याआधी महानगर पालिकेतर्फे तसेच सार्वजनिक वाचनालयातर्फे गौरविण्यात आले आहे. 


        पण आज राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आल्यामुळे खऱ्या अर्थाने आपला सन्मान झाला, असे त्यांना वाटते. आणी आता अधिक जोमाने समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली, असे त्यांचे मत आहे.


            महिलांच्या आरोग्यासाठी कार्य करणाऱ्या मेडीक्विन या संस्थेतर्फे  या महिला डॉक्टरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मेडीक्विनच्या संस्थापिका डॅा. प्रेरणा बेरी - कळेकर,  सचिव डॉ. प्राजक्ता शाह,  गोवर्धन एको- व्हिलेज च्या  महिला सक्षमीकरण कार्यक्रम प्रमुख डॅा. संध्या सुब्रमण्यम  उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments