ई प्रभागात अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाईकल्याण , प्रतिनिधी : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच सर्व प्रभागाच्या  सहा. आयुक्त यांना दिलेल्या निर्देशानुसार आज विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ई प्रभागातील सहा. आयुक्त भारत पवार यांनी नांदिवली मधील गार्डियन स्कूल येथील अमृतलाल पटेल व मनीष भाई पटेल यांचे तळ +6 मजली RCC इमारतीचे चालू असलेल्या अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या कारवाईस आज प्रारंभ केला. 


          हि कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका सर्व्हेअर व 7 कॉम्प्रेसर,1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments