रिक्षा चालकांसाठी वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण –डोंबिवली शहरातील रिक्षा चालकांच्या न्यायिक मागण्या मान्य न झाल्याच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी बुधवारी वंचित बहुजन आघाडी प्रणित स्वाभिमानी रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने इंदिरा चौकात धरणे आंदोलन केले.


      आंदोलनात महासचिव मिलिंद साळवे, दिनेश कांबळे,उपाध्यक्ष शशीकांत वीरकर, शहर अध्यक्ष  सुरेंद्र ठोके, राजू काकडे, सदस्य एजाज खान,संतोष खंदारे,प्रशांत टेकुळे आणि अमीर शेख आदिसह अनेक पदाधिकारी वकार्यकर्ते उपस्थित होते.उपप्रादेशिक परिवहन विभागाने ककेलेली दरवाढ अन्यायकारक आहे. कल्याण-डोंबिवली शहरात २०२१ या वर्षात सीएनजी गॅस दर याचा  विचार करून तात्काळ भाडेवाढ निश्चित करावी. 


            ५०० रुपये एवढा अन्यायकारक दंड न घेता जुनाच दंड कायम ठेवण्यात यावा. बिना वर्दी कर्त्यव्यावर नसताना रिक्षांचे फोत काढून ऑनलाईन दंड करणे असे कृत्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणे, कल्याण-डोंबिवलीत सरसकट मित्र पद्धत सुरूं करावी अश्या मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडी प्रणित स्वाभिमानी रिक्षा चालक-मालक संघटनेने आंदोलन केले.यावेळी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्याचे वपोनी सचिन सांडभोर यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments