भिवंडी पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपचे महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड


भिवंडी : दि. 21 (प्रतिनिधी ) भिवंडी पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली . भाजपा-शिवसेनेमध्ये झालेल्या समझोत्यानुसार पंचायत समितीचे सभापतीपद भाजपाकडे सोपविण्यात आले आहे. केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या पुढाकाराने भिवंडी पंचायत समितीतील सभापती व उपसभापतींपदाबाबत भाजपा व शिवसेना यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार सभापतीपदी काल्हेर गणातून निवडून आलेले महेंद्र पाटील यांची निवड झाली. 


        सभापती नमिता गुरव यांनी राजीनामा दिल्यानंतर आज सभापतीपदाची सूत्रे  महेंद्र पाटील यांनी स्वीकारली. या वेळी तहसीलदार अधिक पाटील व  गटविकास अधिकारी प्रदिप घोरपडे आदी उपस्थित होते. भाजपचे आमदार महेश चौघुले,माजी आमदार योगेश पाटील,काल्हेर माजी सरपंच श्रीधर पाटील, जयवंत पाटील,पं. स. माजी उपसभापती गजानन असावरे,शैलेश शिंगोळे,ऍड.सिद्धार्थ भोईर, व मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments