जुडो स्पर्धेत डोंबिवलीकर खेळाडू यांचे यश

 


कल्याण , प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीमुंबई तर्फे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात ४ थ्या आर.वाय.पी. इनव्हीटेशनल स्पोर्टस मिट २०२१ अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. यामधे ज्युदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामधे मुंबई सह डोंबिवलीठाणेपुणेनाशिककोल्हापूर येथील ज्युदोका सहभागी झाले होते. 


या स्पर्धेत डोंबिवलीच्या व्हिक्टरी ज्युदो क्लबच्या ज्युदोकांनी 'बेस्ट ज्युदोका पुरस्कारासह अनेक पदकांची लयलूट केली. तेजस चव्हाण यास १६ वर्षांखालील गटात बेस्ट ज्युदोका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व्हिक्टरी ज्युदो क्लब च्या खालील ज्युदोकांनी  खेळाचे उत्तम प्रदर्शन करत कोच पूर्वा मॅथ्यू व आशुतोष लोकरे यांच्या सुयोग्य  मार्गदर्शनाखारली ७ सुवर्णपदके ६ रौप्य पदके आणि ५ कांस्य पदके पटकावली  अशी माहिती व्हिक्टरी ज्युदो क्लब चे संस्थापक  के.ए. मॅथ्यू व लीना ओक मॅथ्यू यांनी दिली.

Post a Comment

0 Comments