मुथा फाउंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि लसीकरण शिबीर


कल्याण , प्रतिनिधी : कल्याण मधील मुथा फाउंडेशनच्या वतीने भव्य मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि लसीकरण शिबिराचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते. मुस्लीम बहुल भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड याठिकाणी घेण्यात आलेल्या शिबिराचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.


मुथा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांनी पुढाकार घेत या परिसरातील सर्वे केला. त्या सर्वेत बहुसंख्य नागरिकांना डोळ्यांची समस्या असल्याचे आणि कमी प्रमाणात लसीकरण झाल्याचे निदर्शनास आल्याने डॉ. कैलाश पवार, डॉ. मनीष रेंघे डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांच्या सहकार्याने  या नेत्र तपासणी शिबिराचे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सध्या ओमीक्रोन विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता पालिका आयुक्त डॉ. विजय  सूर्यवंशी यांच्या सहकार्याने येथील नागरिकांसाठी कोविड लसीकरणाची देखील व्यवस्था करण्यात आली होती.


       यावेळी मुथा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्यासह कोणार्क देसाईसदानंद तिवारीअनिल पाटीलराम तरेइफ्तेखार खानराकेश म्हात्रेमनीष त्रिपाठीमनोज सिंहसंगीता भोईरआजम शेखशिबू शेखफाइन मुल्लासुजाता परब, मीनाक्षी घुमरे आदींसह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिराच्या सुरवातील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बिपीन रावत यांच्यासह सैन्यातील इतर जणांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या शिबिराच्या आयोजनासाठी येथील नागरिकांनी मुथा फाउंडेशनचे आभार मानले. 

Post a Comment

0 Comments