महेंद्र सानप क्रांतिवीर वसंतराव नाईक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित


कल्याण , प्रतिनिधी : वसंत सोशल फाउंडेशन नाशिक तर्फे दरवर्षी दिला जाणाऱ्या राज्य स्तरीय पुरस्काराचा वितरण सोहळा  नुकताच नाशिक येथे पार पडला. यावेळी व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड तसेच समाजकल्याण न्यासचे राष्ट्रीय अध्यक्ष सोन्या पाटील व वसंत फाउंडेशनचे अध्यक्ष नंदू सानप हे उपस्थित होते.


कोंडाजी आव्हाड यांच्याहस्ते विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींना हा पुरस्कार विचरण करण्यात आला. ज्यामध्ये कल्याण येथील अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे सहसचिव महेंद्र सानप यांना उद्योजक क्षेत्राचा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला. शाल श्रीफळ आणि सलमान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून अशा पुरस्काराने अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते असे महेंद्र सानप यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.


 त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समाजात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांनी आपला उद्योग व्यवसाय सांभाळून सामजिक कार्यात सक्रिय असलेल्या महेंद्र सानप यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments