पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती ची गरज - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई दि. 17 : -  निसर्ग आणि  पर्यावरण रक्षण हे आपले कर्तव्य मानले पाहिजे. शुद्ध हवा; शुद्ध पाणी हा आपला अधिकार आहे. मात्र प्रदूषणामुळे पर्यावरणाचा रास होत आहे.कोरोना सारख्या महामारी विरुद्ध जसे आपण एकजुटीने लढलो तसेच प्रदूषण रोखण्यासाठी लढले पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्याची गरज आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 


          नवीदिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब येथे जागतिक पर्यावरण परिषदेचे उदघाटन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ना.आठवले बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रीय नागरी आणि पर्यावरण संरक्षण संस्थे चे अध्यक्ष विजयराजे ढमाल होते. तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष अशोक गायकवाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.


          यावेळी निसर्ग पर्यावरण रक्षण क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्याना  पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्रात बांबूची लागवड करणारे शेतकरी नेते  पाशा पटेल यांना केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी पर्यावरण संरक्षण संस्थेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

 

         पर्यावरण रक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाने पुढाकार घेतला असून रिपब्लिकन पक्षात पर्यावरण आघाडी ची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी यावेळी दिली.     

Post a Comment

0 Comments