भारतभरात चार्जिंग सुविधा उभारण्यासाठी प्लग मोबिलिटीचा पुढाकार

■फोर्टम चार्ज अॅण्ड ड्राइव्हच्या साथीने पुढील ५ वर्षात ३२०० चार्जिंग पॉईंट्स उभारणार ~


मुंबई, ८ डिसेंबर २०२१: भारतातील पहिली इलेक्ट्रिक वेहिकल मोबिलिटी कंपनी कारझोनरेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या 'प्लग मोबिलिटी'ने फोर्टम चार्ज अॅण्ड ड्राइव्ह इंडिया प्रा. लि. या आघाडीच्या नॉर्डिक इलेक्ट्रिक व्हिइकल (ईव्ही) चार्जिंग सर्विस प्रोव्हायडर कंपनीसोबत भागीदारी केली आहे. यातून भारतात पुढील ५ वर्षांत कारझोनरेंटच्या १९००० गाड्यांच्या ताफ्याला चार्जिंग सुविधा पुरवली जाणार आहे. फोर्टम सीअॅण्डडी या काळात प्लग मोबिलिटीच्या या ताफ्याच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी ३२०० चार्जिंग पॉईंट्स उभारणार आहे.


       या कराराचा भाग म्हणून संपूर्ण भारतातील ७९ शहरे आणि नगरांमध्ये एकूण ३२०० डीसी००१ आणि सीसीएस चार्जिंग पॉईंट चार्जर्स लावले जाणार आहेत. कारझोनरेंटने नुकत्याच्या सादर केलेल्या ‘प्लग’ या ईव्ही फ्लीट ब्रँडसाठी ही चार्जिंग सुविधा वापरली जाणार आहे. शिवाय, सामान्य नागरिकांनाही त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या चार्ज करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध असेल. फोर्टम सीअॅण्डडी स्वखर्चाने या सुविधा उभारून त्यांचे कार्यचलन पाहणार आहे आणि हळूहळू चार्जिंग स्टेशन्सही उभारले जातील. या चार्जर्सची क्षमता १००,००० किलोवॅटहून अधिक असेल.


     कारझोनरेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार विज म्हणाले, “कारझोनरेंट आपल्या प्लग या उपक्रमातून विविध प्रकारच्या गरजांसाठी शोफर-ड्रिव्हन ईव्ही फ्लीट पुरवणार आहे. कॉर्पोरेट बिझनेस ट्रॅव्हल आणि कर्मचाऱ्यांचे दळणवळण, पाहुणे आणि क्रू/स्टाफचा प्रवास या हॉस्पिटॅलिटी आणि एव्हिएशन क्षेत्रातील गरजा, केंद्र आणि राज्य सरकार तसेच पीएसयू यांच्या अधिकृत प्रवास कार, एअरपोर्ट टॅक्सी सेवा आणि एसएमई क्लाएंट यांना सेवा देण्यासाठी भारतभरात १९००० ईव्ही सादर करून पुढील पाच वर्षांत ४ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी करणे, हा आमचा उद्देश आहे. या मार्गावरील आमच्या प्रयत्नांना वेग देण्यासाठी फोर्टमसारख्या अग्रणी कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. स्थानिक पातळीवर या कंपनीची असलेली लक्षणीय उपस्थिती आणि भारतीय बाजारपेठेत ईव्हीला असलेल्या प्रचंड संधी यामुळे या भागीदारीबद्दल आम्ही उत्सुक आहोत.”


      फोर्टम इंडिया प्रा. लि.चे अध्यक्ष श्री. संजय अग्रवाल म्हणाले, “कार्बनमुक्ततेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत देशभरात चारचाकी वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उभारण्यासाठी कारझोननेटसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. खासगी असो की व्यावसायिक वापर, ईव्हीचा वापर वाढावा यासाठी चालकांना दररोज इलेक्ट्रिक मोबिलिटीचे लाभ मिळावेत यासाठी फोर्टममध्ये आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत."

Post a Comment

0 Comments