त्या` तीन धाडसी तरुणांचा मनसे कडून सत्कार....


डोंबिवली ( शंकर जाधव ) शेजारच्या घरी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रथम अग्निशमक दलाला फोन जातो. मात्र प्रसंगावधान राखून काही धाडसी तरुण आपला जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी डोंबिवलीतील तिघांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या तिघांचे मनसेने सत्कार करून कौतुक केले.


     डोंबिवली मनसे शहर संघटक संजीत ताम्हाणे आणि कार्यकर्ते शशिकांत कोकाटे यांनी धाडस दाखवलेल्या  हर्षदा चव्हाण, सात्विक देशमुख, राज चव्हाण यांचा सत्कार करून केला. पूर्वेकडील गांधीनगरमधील त्रिपाली सोसायटीतील बी विंग मध्ये दुसऱ्या मजल्यावरील किरणकुमार डे यांच्या घरी सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास आग लागली आहे. या घटनेची माहिती तत्काळ अग्निशमक दलला देण्यात आली. आत्र अरुंद रस्ते व चालू असलेली रस्त्यांची कामे,यांमुळे बंब घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला होता. तोपर्यत सोसायटीतील हर्षदा चव्हाण, सात्विक देशमुख, राज चव्हाण यांनी प्रसंगावधान राखून आगीवर नियंत्रण मिळवले.


      या तिघांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला.त्यादरम्यान त्यांच्या बेडरूममधील देव्हाऱ्यातील बल्बच्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागली.आगीने देव्हारा पेटल्यावर शेजार असलेल्या खिडकीच्या पडद्यांनी पेट घेतला.आगीने उग्ररूप धारण केले.वातानुकीतिक यंत्रणेत आगीच्या ज्वाला पोहोचल्याने स्फोट झाला.त्या आवाजाने सोसायटीतील रहिवाश्यांना आग लाग्लायचे समजले.किरणकुमार तसेच अग्निशमक दलाला तात्काळ फोन करून घटनेची माहिती दिली.किरणकुमार यांनी तात्काळ घराकडे धाव घेतली.दरवाजा उघडताच धुराचे लोटच्या लोट बाहेर पडले. 


       परंतु जीवाची पर्वा न करता हर्षदा, सात्विक आणि राज यांनी आग विझविण्यास सुरुवात केली.धुरात जीव घुसमटत असतानाहीघरातील सर्व खिडक्या उघडून धूर बाहेर जाऊ दिला.तर भडकलेल्या आगीवर पाण्याचा मारा करून तिच्यावर नियंत्रण मिळवले.या आगीच्या बेडरूममधील एसी आणि सिलिंगच्या पीओपीचे मोठे नुकसान झाले.मधल्या भागात माळ्यावरील पाण्याच्या टाकीपर्यत आगीची झळ पोहीचाली होती.गॅसने भरलेल्या सिलेंडरला आगीची झळ पोहचली असती तर मोठा अनर्थ घडला असता.


चौकट

 हिंम्मत दाखवली म्हणूनच मोठा अनर्थ टळला... 


        घराला आग लागल्याचे दिसतातच किरणकुमार यांना फोन करून कळविले.दहा मिनिटांनी ते घरी आल्यावर त्यांनी घराचा दरवाजा उघडला.घरात आग आणि प्रचंड धूर असल्याने घरात जाऊन आग विझवणार  कशी असा प्रश्न पडला होता.जर आग विझवली नाही आगीचे लोट पसरून इतर घरालाही आग लागण्याची शक्यता होती.म्हणून घरातील सर्व खिडक्या उघडून धूर बाहेर पडण्यासाठी जाग करून दिली.


       त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेजारांच्या घरातून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. किचनमधील  गॅसने भरलेल्या सिलेंडरला आग लागून नये म्हणून खुपचा काळजी घेतली.दैव बलत्तर म्हणून आग किचनपर्यत पोहोचली नाही.हिम्मत दाखवली म्हणूनच मोठा अनर्थ टळला..         

Post a Comment

0 Comments